Aditya L1 Mission eSakal
विज्ञान-तंत्र

ISRO : 1,480 किलोचा उपग्रह, 15 लाख किलोमीटर अंतर, अवघ्या 20 सेकंदांमध्ये मिळणार डेटा! 'आदित्य L1' मोहिमेची खास वैशिष्ट्ये

Aditya L1 Mission : या मोहिमेमध्ये सूर्याचा अभ्यास करण्यासाठी 'आदित्य' उपग्रह अंतराळात प्रक्षेपित करण्यात येणार आहे.

Sudesh

ISRO Sun Mission : चांद्रयान-3 मोहीम यशस्वीपणे पार पाडल्यानंतर, इस्रो आता आपल्या पहिल्या सौर मोहिमेसाठी सज्ज झालं आहे. 2 सप्टेंबर रोजी सकाळी 11:50 वाजता भारताचं हे सूर्ययान लाँच होईल. या मोहिमेमध्ये सूर्याचा अभ्यास करण्यासाठी 'आदित्य' उपग्रह अंतराळात प्रक्षेपित करण्यात येणार आहे.

भारताचं हे पहिलंच ऑब्जर्वेटरी-क्लास स्पेस बेस सौर मिशन आहे. शनिवारी लाँच केल्यानंतर 'आदित्य'ला 'L1' या लॅग्रेंज पॉइंटवर पोहोचण्यासाठी सुमारे चार महिन्यांचा कालावधी लागेल. हा पॉइंट पृथ्वीपासून सुमारे 15 लाख किलोमीटर दूर आहे.

1480 किलोचा उपग्रह

आदित्य उपग्रहामध्ये 590 किलोचं प्रॉपल्शन फ्लुएल असणार आहे. तर, यामध्ये असणाऱ्या विविध उपकरणांचं वजन हे एकूण 890 किलो आहे. बंगळुरूममध्ये असणाऱ्या इंडियन इन्सिट्यूट ऑफ अ‍ॅस्ट्रोफिजिक्सने याचं डिझाईन केलं आहे. तर, यातील प्रमुख पेलोड VELC हा मुख्यत्वे अहमदाबादमध्ये तयार करण्यात आला आहे.

'आदित्य' नाव का?

या उपग्रहाला आदित्य नाव देण्यामागे मोठं कारण आहे. आदित्य हे सूर्याच्या 12 नावांपैकी एक आहे. तसंच, भारताचा भास्कर नावाचा एक उपग्रह आधीपासूनच अवकाशात आहे. त्यामुळे, सौर मोहिमेसाठी असणाऱ्या उपग्रहासाठी 'आदित्य' हे नाव निश्चित करण्यात आलं.

5 वर्षे सूर्याचा करणार अभ्यास

L1 या लॅग्रेंज पॉइंटवर प्रस्थापित झाल्यानंतर आदित्य सूर्याचा अभ्यास सुरू करेल. पृथ्वीवरून या पॉइंटपर्यंत जाण्यासाठी आदित्यला चार महिन्यांचा वेळ लागेल. त्यानंतर पुढे पाच वर्षांपर्यंत आदित्य सूर्याचं निरीक्षण आणि अभ्यास करेल.

सूर्याच्या आतील पृष्ठभागाचं तापमान हे सुमारे 5,500 डिग्री सेल्सिअस एवढं असतं. त्यानंतर मधल्या स्तरांवरील तापमान हे कमी होत जातं. मात्र, सर्वात बाहेरील आवरणावर असणारं तापमान हे पुन्हा कमी होण्याऐवजी वाढून 15 लाख डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचतं. याच्या कारणाचा शोध घेण्याचा प्रयत्न आदित्य करेल.

यासोबतच कोरोनल हीटिंग, सौर वादळे, कोरोनाल मास इंजेक्शन, फ्लेअर्स पृथ्वीच्या जवळील अंतराळ हवामान, सूर्यावरील वातावरण आणि इतर बऱ्याच गोष्टींचा अभ्यास आदित्य करणार आहे.

20 सेकंदात मिळणार डेटा

इस्रोच्या एका वैज्ञानिकाने दिलेल्या माहितीनुसार, आदित्य उपग्रह आपल्या उपकरणांच्या मदतीने सूर्याचे कित्येक फोटो घेईल. सोबतच, सौर वादळे आणि इतर गोष्टींबद्दल डेटा गोळा करेल. यासाठी आदित्यमधील SUIT (सोलार अल्ट्राव्हायलेट इमेजिंग टेलिस्कोप) चा वापर करण्यात येईल. यानंतर VELC चे शटर उघडून सूर्याचा फोटो घेण्यात येईल. हा डेटा 20 सेकंदांमध्ये इस्रोला मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : आमदार अपात्रतेप्रकरणी आठवड्याभरात निर्णय घ्या; अन्यथा कारवाई करू; सरन्यायाधीशांचा विधानसभा अध्यक्षांना थेट इशारा

Crime: शरीरावर जखमा, फाटलेले कपडे, पुरूषाची चप्पल... रेल्वे स्थानकाजवळ अज्ञात महिलेचा अर्धनग्न मृतदेह अन्..., नेमकं काय घडलं?

Pune Petrol Pump Attack Criminals Arrested : पुण्यात नदीपात्रात दडून बसलेल्या दोन अट्टल गुन्हेगारांना, पोलिसांनी सापळा रचून पकडलं!

Latest Marathi Breaking News:अमित ठाकरे यांची त्यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यावर पहिली प्रतिक्रिया

कलाकार खूप फॅन्सी जेवतात? मुळीच नाही, गिरीजा ओकने दाखवलं जेवणाचं ताट; वरणभात, अळूवडी अन्...

SCROLL FOR NEXT