Aditya L1 Nigar Shaji eSakal
विज्ञान-तंत्र

Nigar Shaji : शेतकऱ्याची लेक सांभाळतेय 'आदित्य एल-1' ची कमान; इस्रोच्या महिला वैज्ञानिकाची जगभरात चर्चा!

Aditya L1 Mission : सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोने 'आदित्य एल-1' हा उपग्रह यशस्वीपणे लाँच केला आहे.

Sudesh

'चांद्रयान-3'च्या यशानंतर इस्रोने शनिवारी (2 सप्टेंबर) आणखी एक मोठी कामगिरी पार पाडली. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोने 'आदित्य एल-1' हा उपग्रह यशस्वीपणे लाँच केला. ही भारताची पहिलीच सौर मोहीम असणार आहे. सलग दोन मोहिमा यशस्वीपणे पार पाडल्यामुळे इस्रोच्या शास्त्रज्ञांचं जगभरातून कौतुक होत आहे.

इस्रोच्या या यशामध्ये महिला वैज्ञानिकांचा मोठा वाटा आहे. विशेष म्हणजे सूर्य मोहिमेचं नेतृत्त्वच एक महिला वैज्ञानिक करत आहे. निगार शाजी असं या वैज्ञानिकाचं नाव आहेत. आदित्यचं यशस्वी लाँचिंग झाल्यानंतर त्यांनी आनंद व्यक्त केला. केवळ भारतालाच नाही, तर संपूर्ण जगाला या मोहिमेचा फायदा होणार आहे, असं त्या म्हणाल्या.

शेतकरी कुटुंबातून आल्या आहेत शाजी

निगार शाजी या तामिळनाडूच्या रहिवासी आहेत. त्यांचे आई-वडील शेती करतात. त्यांनी तिरुनेवेली गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं. त्या इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेश इंजनिअर आहेत. यानंतर त्यांनी रांचीमधील बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून आपलं मास्टर्स पूर्ण केलं.

1987 सालीच त्यांनी सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये काम करण्यास सुरुवात केली. यानंतर त्या यूआर राव सॅटेलाईट टीममध्ये सहभागी झाल्या. आदित्य एल-1 मोहिमेच्या प्रोजेक्ट डिरेक्टर असणाऱ्या शाजी या कम्युनिकेशन आणि आंतरग्रहीय उपग्रह मोहिमांच्या तज्ज्ञ आहेत. त्यांनी यापूर्वी भारताच्या रिमोट सेन्सिंग सॅटेलाईट SAT-2A या मोहिमेच्या असोसिएट प्रोजेक्ट डिरेक्टर म्हणूनही काम केलं आहे.

अन्नपूर्णी सुब्रमण्यम यांचंही मोठं योगदान

केरळच्या अन्नपूर्णी सुब्रमण्यम यांचंही आदित्य मोहिमेत मोलाचं योगदान आहे. त्या संगीतकार कुटुंबातून आल्या आहेत. त्यांनी 'आयआयए'मधून फिजिक्समध्ये पीएचडी केली आहे. त्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅस्ट्रोफिजिक्सच्या संचालिका आहेत. याच संस्थेने आदित्य एल-1 मधील मुख्य पेलोड VELC डिझाईन केलं आहे.

पृथ्वीच्या कक्षेत आदित्य

दरम्यान, शनिवारी प्रक्षेपण झाल्यानंतर सध्या आदित्य उपग्रह हा पृथ्वीच्या कक्षेत आहे. 18 सप्टेंबरपर्यंत तो पृथ्वीभोवती फेऱ्या मारेल. यानंतर तो L1 या पॉइंटच्या दिशेने प्रवास सुरू करेल. सुमारे चार महिने प्रवास करुन, एल-1 या लॅग्रेंज पॉइंटवर प्रस्थापित झाल्यानंतर आदित्य उपग्रह सूर्याचा अभ्यास करेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Attack: होर्मुझमधील तेलवाहू जहाजांवरील हल्ल्यात 2 भारतीय खलाशी बेपत्ता

Kankavli Police Constable Death : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिला पोलिस हवालदाराचा जंगलात आढळला मृतदेह; झाडाला घेतलेला गळफास, तिचा नवरा आहे पोलिस दलात...

सहा वर्षांनी छोट्या पडद्यावर परतणार ही गाजलेली नायिका; 'वहिनीसाहेब' बनून प्रेक्षकांच्या मनावर केलेलं राज्य, कोण आहे ती?

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील वातावरण तापलं! इंडिया आघाडीच्या मोर्चाला सुरूवात, सर्वोच्च न्यायालयात दाखल करणार याचिका

Uttarakhand: चीन-नेपाळ सीमेवरील जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणाची नवी संधी; पहिल्या वर्षी ५० एमबीबीएस जागा

SCROLL FOR NEXT