Aditya L1 Mission eSakal
विज्ञान-तंत्र

Aditya L1 Mission : सूर्याकडे झेप घेण्यासाठी 'आदित्य' सज्ज! इस्रोने शेअर केले नवे फोटो; वापरणार दमदार रॉकेट

ISRO Sun Mission : सूर्याचा अभ्यास करण्यासाठी 'आदित्य एल-1' ही मोहीम राबवण्यात येणार आहे.

Sudesh

ISRO Aditya L1 : 'चांद्रयान-3'च्या यशानंतर आता इस्रो आणखी एक मोठी कामगिरी पार पाडणार आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी 'आदित्य एल-1' ही मोहीम राबवण्यात येणार आहे. ही भारताची पहिलीच सौरमोहीम असणार आहे. याची तयारी पूर्ण झाली असून, 'आदित्य' उपग्रह श्रीहरीकोटा येथील लाँच पॅडवर सज्ज झाला आहे.

इस्रोने एक्स (ट्विटर) पोस्ट करत याबाबत माहिती दिली. आदित्यला अवकाशात घेऊन जाणाऱ्या पीएसएलव्ही-सी57 या रॉकेटचे काही फोटो इस्रोने पोस्ट केले आहेत. यामध्ये आदित्य उपग्रह देखील आहे. श्रीहरीकोटा येथील दुसऱ्या लाँच पॅडवरुन हे रॉकेट प्रक्षेपित करण्यात येईल.

कधी होणार लाँच?

शनिवार, 2 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी आदित्य-L1 चे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. यानंतर सुमारे चार महिने हा उपग्रह अंतराळात प्रवास करेल. सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये असणाऱ्या एका लॅग्रेंज पॉइंटवर हा उपग्रह ठेवण्यात येईल.

हा पॉइंट पृथ्वीपासून सुमारे 15 लाख किलोमीटर दूर आहे. हे अंतर चंद्राच्या तुलनेत चार पटींनी अधिक आहे. त्यामुळे, या ठिकाणी पोहोचण्यासाठी 'आदित्य'ला सुमारे चार महिन्यांचा कालावधी लागेल. (ISRO Aditya Mission)

काय आहे मोहीम?

या मोहिमेच्या माध्यमातून इस्रो सूर्याचा अधिक चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकेल. सूर्याच्या पृष्ठभागावरील तापमान, सौर वादळे, कॉस्मिक रेज आणि इतर बऱ्याच गोष्टींचा अभ्यास करणं इस्रोला शक्य होणार आहे. यासोबतच लँग्रेज पॉइंटजवळच्या कणांचा देखील अभ्यास 'आदित्य' करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT