Aditya L1 Mission Update eSakal
विज्ञान-तंत्र

Aditya L1 Update : महत्त्वाचा टप्पा पार! पृथ्वीच्या कक्षेबाहेर पडून 'आदित्य' उपग्रह 'एल-1' पॉइंटच्या दिशेने रवाना

ISRO Sun Mission : आदित्य एल-1 मोहीम ही सूर्याचा अभ्यास करण्यासाठी राबवण्यात येत आहे.

Sudesh

Aditya Leaves Earth : भारताच्या 'आदित्य एल-1' मोहिमेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. आदित्य उपग्रहाने पृथ्वीची कक्षा सोडली असून, आता त्याचा एल-1 पॉइंटच्या दिशेने प्रवास सुरू झाला आहे. आज (19 सप्टेंबर) पहाटे दोन वाजता या मोहिमेतील ट्रान्स लॅग्रेंजिअल पॉइंट-1 इन्सर्शन मॅन्यूव्हर यशस्वीपणे पार पडलं.

इस्रोने आपल्या अधिकृत एक्स (ट्विटर) हँडलवरून पोस्ट करत याबाबत माहिती दिली. आता आदित्य उपग्रह हा L1 लँग्रेंज पॉइंटच्या दिशेने प्रवास करत आहे. हा पॉइंट पृथ्वीपासून सुमारे 15 लाख किलोमीटर अंतरावर आहे. या पॉइंटवर पोहोचण्यासाठी आदित्यला इथून पुढं 110 दिवसांचा वेळ लागेल.

110 दिवसांनंतर जेव्हा आदित्य उपग्रह L1 पॉइंटजवळ पोहोचेल, तेव्हा आणखी एक मॅन्यूव्हर पार पाडण्यात येईल. या प्रक्रियेने आदित्यला या लॅग्रेंज पॉइंटच्या कक्षेत प्रस्थापित करण्यात येईल. या ठिकाणाहून हा उपग्रह सूर्याचा अभ्यास करणार आहे. (ISRO Aditya L1 Update)

इस्रोची मोठी कामगिरी

देशाची अंतराळ संशोधन संस्था असलेल्या इस्रोने आतापर्यंत कित्येक मोठ्या अंतराळ मोहिमा यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. चांद्रयान, मंगळयान अशा मोहिमांचा यात समावेश आहे. आदित्य एल-1 ही भारताची पहिलीच सौरमोहीम आहे. आदित्यच्या माध्यमातून इस्रोने सलग पाचव्यांदा एखादा उपग्रह किंवा वस्तू यशस्वीपणे पृथ्वीच्या कक्षेबाहेर पाठवली आहे.

काय आहे मोहीम

आदित्य एल-1 मोहीम ही सूर्याचा अभ्यास करण्यासाठी राबवण्यात येत आहे. यासाठी आदित्य नावाचा उपग्रह L1 या लॅग्रेंज पॉइंटवर प्रस्थापित करण्यात येईल. पृथ्वीवरून सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ठराविक वेळेचं बंधन असतं, तसंच बरेच अडथळेही येतात. या पॉइंटवरून मात्र आदित्य 24x7 विना अडथळा सूर्याचं निरीक्षण करू शकणार आहे.

डेटा गोळा करण्यास सुरूवात

दरम्यान, इस्रोने दिलेल्या माहितीनुसार आदित्य उपग्रहावर असणाऱ्या सात पेलोड्स पैकी STEPS उपकरणाने आपलं काम सुरू देखील केलं आहे. या उपकरणातील सेन्सरने पृथ्वीभोवती असणारे सुप्रा-थर्मल आणि ऊर्जावान आयन आणि इलेक्ट्रॉन मोजण्यास सुरुवात केली आहे. हा डेटा शास्त्रज्ञांना पृथ्वीभोवती असलेल्या कणांच्या वर्तनाचे विश्लेषण करण्यास मदत करतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dasara Melava 2026: संजय राऊतांचा अमित शाहांवर हल्लाबोल; 'लॉरेन्स बिश्नोई अस्तित्वात नाही, अमित शाह हेच लॉरेन्स बिश्नोई'

Eknath Shinde : "शेतकऱ्यांच्या लेकींच्या लग्नाचा सर्व खर्च आमचा"; दसरा मेळाव्यातून एकनाथ शिंदेंची सर्वात मोठी घोषणा!

INDW vs ZIMW 3rd T20I: १० चौकार, ५ षटकार अन् ९१ धावा! हरमनप्रीत कौर रडली, चेहरा लपवताना दिसली; म्हणाली, त्या शब्दांनी...

Latest Marathi News Live Update : जाणून घ्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

Dasara Melava : दसरा मेळाव्यात राजकीय रणसंग्राम; मनोज जरांगे आणि रामदास कदम यांच्यातील वाद विकोपास!

SCROLL FOR NEXT