Aditya L1 Mission eSakal
विज्ञान-तंत्र

Aditya L-1 : सौरकंपांच्या अभ्यासासाठी सूर्याचे निरीक्षण गरजेचे - शास्त्रज्ञ प्रा.डॉ.रमेश

शास्त्रज्ञ प्रा.डॉ.रमेश यांची माहिती; ‘आदित्य -एल१’ मोहीम वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे प्रतिपादन

सकाळ वृत्तसेवा

बंगळूर : ‘‘पृथ्वीच्या भूचुंबकीय क्षेत्रामध्ये बदल घडवून आणणाऱ्या सौरकंपांचा अभ्यास करण्यासाठी सूर्याचे २४ तास निरीक्षण करणे आवश्यक आहे,’’ असे भारतीय खगोलभौतिकी संस्थेतील(आयआयए) मुख्य शास्त्रज्ञ प्रा.डॉ.आर.रमेश यांनी शुक्रवारी सांगितले.

भारताच्या पहिल्या सौर मोहिमेला शनिवारी (ता.२) प्रारंभ होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर सूर्याचा अभ्यास करणे महत्त्वाचे का आहे, हे सांगताना ते म्हणाले, ‘‘पृथ्वीवर ज्याप्रमाणे भूकंप होतात, तसेच भूकंप सूर्यावर होतात. त्याला सौरकंप म्‍हणतात.

सूर्याच्या प्रभामंडळातून प्लाझ्मा व चुंबकीय लहरी मोठ्या प्रमाणात बाहेर पडत असतात (कोरोनल मास इंजेक्शन्स -सीएमई).यात लाखो टन सौर पदार्थ अवकाशात फेकले जातात. यातील काही पृथ्वीच्या दिशेने वळू शकतात.’’

ते म्हणाले, की युरोपीय अवकाश संस्था (ईएसए) आणि अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था ‘नासा’ यांनी पूर्वी सौर मोहिमांचे आयोजन केले असले तरी ‘आदित्य- एल१’ मोहीम दोन कारणांसाठी वैशिष्ट्यपूर्ण आहे. सूर्याचे प्रभामंडळ जेथून सुरू होते, त्‍या बिंदूपासून त्याचे निरीक्षण करणार आहोत. तसेच सौर वातावरणातील चुंबकीय क्षेत्रात होणारे बदल आपण नोंदविणार आहेत.

‘सीएमई’चा पृथ्वीवरही परिणाम

‘सीएमई’ काही वेळा उपग्रहांचे नुकसान करतात. ‘सीएमई’तून बाहेर पडणाऱ्या कणांमुळे उपग्रहांवरील सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे निकामी होऊ शकतात. हे ‘सीएमई’ पृथ्वीवरही येतात, असे डॉ. रमेश म्हणाले.

उदा.१९८९ मध्ये सौर वातावरणातून प्रचंड स्फोट झाला होता, त्यावेळी कॅनडातील क्युबेक विजेअभावी ७२ तास अंधारात होते. २०१७ मध्ये याच कारणामुळे स्वित्झर्लंडमधील झुरिच विमानतळावर १४ ते १५ तास वीजपुरवठा खंडित झाला होता.

उत्तर व दक्षिण गोलार्धातील महाचुंबकीय क्षेत्राप्रमाणे असलेले ‘सीएमई’ पृथ्वीवर पोहचल्यास ते चुंबकीय क्षेत्राच्या रेषेवरून प्रवास करू शकतात. ते पृथ्वीच्या भूचुंबकीय क्षेत्रात परिवर्तन घडवू शकतात व उच्च क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मरवर त्याचा परिणाम होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT