Aditya L1 Update eSakal
विज्ञान-तंत्र

Aditya L1 Update : 'आदित्य एल-1' पोहोचलं पृथ्वीच्या वरच्या कक्षेत; इस्रोने दिली मोठी अपडेट!

ISRO Sun Mission : आदित्य एल-1 ही भारताची पहिलीच सौरमोहीम आहे.

Sudesh

आदित्य एल-1 मोहिमेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. आदित्य उपग्रहाचं पहिलं अर्थ-बाउंड मॅन्यूव्हर पूर्ण झालं आहे. यानंतर हा उपग्रह पृथ्वीच्या वरच्या कक्षेत पोहोचला आहे. तो सध्या 245x22,459 किलोमीटर कक्षेत असल्याची माहिती इस्रोने दिली आहे.

पुढील मॅन्यूव्हर 5 तारखेला

यापुढील कक्षा बदल प्रक्रिया 5 सप्टेंबर रोजी पार पडणार असल्याची माहिती इस्रोने आपल्या एक्स पोस्टमध्ये दिली आहे. मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास ही प्रक्रिया पार पडेल.

शनिवारी (2 सप्टेंबर) 'आदित्य एल-1'चं यशस्वी प्रक्षेपण करुन इस्रोने आणखी एक विक्रम केला. यावेळी PSLV रॉकेटने आदित्य उपग्रहाला पृथ्वीच्या खालच्या कक्षेत प्रस्थापित केलं होतं. यानंतर आज या उपग्रहाला वरच्या कक्षेत ढकलण्यात आलं आहे. अशा प्रकारे टप्प्या-टप्प्याने हा उपग्रह पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर ढकलण्यात येणार आहे.

आदित्य उपग्रह साधारपणे 18 सप्टेंबरपर्यंत पृथ्वीच्या कक्षेत राहणार आहे. या दरम्यान तो पृथ्वीभोवती फेऱ्या मारुन गती प्राप्त करेल. पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडल्यानंतर आदित्य अंतराळातील L1 या पॉइंटच्या दिशेने आपला प्रवास सुरू करेल. या पॉइंटवर पोहोचण्यासाठी त्याला सुमारे चार महिने लागतील.

एल-1 हा अंतराळातील असा पॉइंट आहे, जिथे पृथ्वी आणि सूर्याचं गुरुत्वाकर्षण एकमेकाला जवळपास कॅन्सल करतं. त्यामुळे या पॉइंटवर ठेवण्यात आलेली वस्तू तिथेच स्थिर ठेवण्यासाठी अगदी कमी इंधनाची गरज भासते. म्हणूनच, सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य या L1 पॉइंटच्या हेलॉ ऑर्बिटमध्ये प्रस्थापित करण्यात येणार आहे. तिथून पुढे 5.5 वर्षांपर्यंत तो सूर्याचा अभ्यास करेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

Best Mileage Bikes : कमी पेट्रोलमध्ये जास्त चालतात 'या' 5 दमदार बाईक्स; सर्वाधिक मायलेज अन् किंमत लाखाच्या आतच

वल्लरीचा खोटेपणा उघड होणार? तू हि रे माझा मितवा मधील ट्विस्टने प्रेक्षक चकित

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध तीव्र

SCROLL FOR NEXT