Jio Airtel Vodafone-Idea (Vi)
Jio Airtel Vodafone-Idea (Vi)  Sakal
विज्ञान-तंत्र

T20 World Cup पाहा स्वस्तात, 'हे' आहेत बेस्ट डेटा प्लॅन

सकाळ डिजिटल टीम

T20 World Cup 2021 सुरु झाला असून तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवर T20 World Cup चा आनंद घ्यायचा असेल, तर Jio Airtel आणि Vodafone-Idea (Vi) या टेलिकॉम कंपन्यांकून तुमच्यासाठी काही बेस्ट प्रीपेड प्लॅन ऑफर केले जात आहेत. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 100 जीबी पर्यंतचा डेटा आणि त्यासोबतच डिस्ने + हॉटस्टार (Disney + Hotstar) मोबाईलचे फ्री सबस्क्रिप्शन खास T20 World Cup पाहण्यासाठी दिले जात आहे. योजनांचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला यात फ्री कॉलिंग आणि एसएमएस सारखे लाभ देखील मिळतील. वाचा सविस्तर

एअरटेलचा 499 रुपयांचा प्लॅन

हा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह मिळतो, ज्यामध्ये तुम्हाला दररोज 3 जीबीनुसार एकूण 84 जीबी डेटा मिळेल. या प्लॅनमध्ये कंपनी देशभरातील सर्व नेटवर्कवर अनलिमीटेड कॉलिंगची ऑफर देखील देत असून दररोज 100 फ्री एसएमएस दिले जातात. इतकेच नाही तर प्लॅनमध्ये T20 World Cup पाहण्यासाठी तुम्हाला Disney + Hotstar चे फ्री सब्स्क्रीप्शन देखील मिळेल. याशिवाय, कंपनी या प्लॅनमध्ये 30 दिवसांसाठी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओच्या मोबाईल व्हर्जनची मोफत ट्रायलही देत ​​आहे.

रिलायन्स जिओचा 499 रुपयांचा प्लॅन

जिओच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 3 जीबी डेटासह 6 जीबी जास्तीचा डेटा मिळेल. त्यामुळे तुम्हाला प्लॅनमध्ये एकूण डेटा 90 जीबी मिळतो. या प्लॅनची वैधता 28 दिवसांची असून यामध्ये Disney + Hotstar मोबाईलचे फ्री सबस्क्रिप्शनसह देण्यात येते. या प्लॅनमध्ये तुम्हाला देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर अनलिमीटेड कॉलिंग आणि दररोज 100 मोफत एसएमएसचा लाभ देखील घेता येईल.

वोडाफोन आयडियाचा 501 रुपयांचा प्लॅन

हा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो आणि प्लॅनमध्ये कंपनी दररोज 3 जीबी डेटासह 16 जीबी अतिरिक्त डेटा फ्री देत आहे. त्यामुळे प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 100 जीबी डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये T20 World Cup लाईव्ह पाहण्यासाठी Disney + Hotstar चे फ्री सबस्क्रिप्शन देखील मिळते. या प्लॅनमध्ये वोडाफोन दररोज 100 मोफत एसएमएस आणि अनलिमीटेड कॉलिंग सुविधा देखील देत आहे. कंपनीचा हा प्लॅन बिंज ऑल नाईट आणि वीकेंड डेटा रोलओव्हर बेनिफिट देखील देतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : अमेरिका, कॅनडा अन् अरब देशांकडून 'आप'ला फंडिंग; ED कडून गृहमंत्रालयाला अहवाल

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुंबईतील विले पार्ले येथील शाळेत बरोबर ६ वाजता मतदान बंद

Gadchiroli News : कधी वाघ, कधी हत्ती...सोसायचे किती? ग्रामस्थ भयछायेत; जंगलात तेंदूपाने संकलन करताना जीव मुठीत!

Ebrahim Raisi: इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमुळं भारतात उद्या राष्ट्रीय दुखवटा जाहीर

Helmet Man : दागिने, घर, जमीन विकून हा व्यक्ती लोकांना फुकटात वाटतोय हेल्मेट,राघवेंद्रचे होतंय कौतूक

SCROLL FOR NEXT