Mobile Game  eSakal
विज्ञान-तंत्र

Mobile Game : आता बिनधास्त खेळा BGMI; केंद्र सरकारकडून मिळाला ग्रीन सिग्नल! तीन महिने सुरू होती चाचणी

India Games : सरकारने फ्री फायर गेमलाही भारतात परवानगी दिली आहे.

Sudesh

Mobile Games in India : बॅटलग्राउंड मोबाईल इंडिया, म्हणजेच BGMI गेमच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने या गेमला पूर्णपणे मंजूरी दिली आहे. मनीकंट्रोलने याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

गेल्या वर्षी हेरगिरीच्या संशयामुळे कित्येक चिनी अ‍ॅप्स आणि गेम्स बंद करण्यात आले होते. यामध्ये PUBG गेमचाही समावेश होता. यानंतर यासारखीच BGMI ही गेम लाँच झाली होती. मात्र, सरकारने यावर देखील बंदी लागू केली होती.

अखेर यावर्षी मे महिन्यात सरकारने पुन्हा BGMI ला भारतात परवानगी दिली होती. मात्र, ही परवानगी केवळ तीन महिन्यांसाठी होती. या काळामध्ये सरकार या गेमचं ऑडिट करणार होतं. दिलेल्या गाईडलाईन्सचं पालन ही गेम करत आहे का हेदेखील पाहण्यात येणार होतं.

मिळाली पूर्ण परवानगी

तीन महिने पूर्ण झाल्यानंतर आता सरकारने या गेमला देशात पूर्णपणे परवानगी दिली आहे. यामुळे क्राफ्टॉनला मोठा दिलासा मिळाला आहे. अर्थात, यातही सरकारने आणखी एक अट लागू केली आहे. सरकार अजूनही दर तीन महिन्यांनी या गेमचं ऑडिट करेल. जर या गेममध्ये आधीप्रमाणेच काही आक्षेपार्ह वा संशयास्पद गोष्ट आढळली, तर सरकार पुन्हा ही गेम बॅन करू शकतं.

गेममध्ये मोठे बदल

BGMI गेमला भारतात परवानगी देताना सरकारने काही बदल सुचवले होते. नव्या गेममध्ये 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी फिक्स टाईम असणार आहे. सोबतच, अल्पवयीन मुलांना गेम खेळण्यासाठी पालकांची परवानगी आवश्यक आहे. 18 वर्षांपेक्षा मोठ्या व्यक्तींसाठी देखील एका दिवसाला 6 तासांची टाईम लिमिट असणार आहे.

फ्री फायरलाही परवानगी

दरम्यान, सरकारने गरेना फ्री फायर या गेमलाही परवानगी दिली आहे. BGMI आणि फ्री फायर या दोन्ही गेम्स जेव्हा लाँच झाल्या होत्या, तेव्हा भारतात सर्वाधिक कमाई करणाऱ्या अँड्रॉईड अ‍ॅप्सपैकी होत्या. लाखो लोकांनी त्यांना डाऊनलोड केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! भोटेकोशी नदीला महापूर, गाड्या-इमारती क्षणार्धात वाहून गेल्या, धक्कादायक VIDEO समोर...

"मी फक्त 50 रुपयांत केस कापतो"; कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचं विधान; संपत्तीबाबत भाजपचा खुलासा

Electric Short Circuit: राजुरीत शॉर्टसर्किटमुळे दिड एकर ऊस जळून खाक; शेतकरी हाडवळे यांचे लाखो रुपयांचे नुकसान, महावितरणकडून भरपाईची मागणी

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

SCROLL FOR NEXT