X News Headlines eSakal
विज्ञान-तंत्र

X News Headlines : आता 'एक्स'वर दिसणार नाहीत बातम्यांच्या हेडलाईन्स; लाईक्स अन् रिप्लायही लपवता येणार

Elon Musk : इलॉन मस्कने एक्स पोस्ट करत याबाबत माहिती दिली.

Sudesh

इलॉन मस्कने विकत घेतल्यापासून ट्विटरचा (आता एक्स) चेहरामोहराच बदलून गेला आहे. या अ‍ॅपचं नाव, लोगो आणि पॉलिसीमध्ये देखील बदल करण्यात आला आहे. आता यामध्ये आणखी मोठे बदल होणार आहेत.

एक्सवर करण्यात आलेला सगळ्यात मोठा बदल म्हणजे, आता याठिकाणी बातम्यांच्या हेडलाईन्स दिसणार नाहीत. इलॉन मस्कने एक्स पोस्ट करत याबाबत माहिती दिली. यासोबतच, लवकरच एखाद्या पोस्टला मिळालेले लाईक्स, रिपोस्ट यांची संख्या देखील लपवता येणार असल्याचं इलॉनने स्पष्ट केलं.

इलॉन मस्कचं लक्ष्य सध्या एक्सची टाईमलाईन अधिक स्पष्ट आणि वाचण्यासाठी सुलक्ष बनवणं हे आहे. यामुळेच त्याने हेडलाईन्स हटवण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर इलॉनने पोस्ट करत सांगितलं, की आता इंटरॅक्शन काउंट दाखवणाऱ्या सर्व बटणांना हटवण्यावर काम सुरू आहे. जोपर्यंत एखाद्या पोस्टवर यूजर्स टॅप करणार नाहीत, तोपर्यंत त्यांना केवळ पोस्टचा व्ह्यू काउंट दिसणार असल्याचं इलॉनने सांगितलं आहे.

केवळ नंबर्स होणार हाईड?

अर्थात, इलॉनने अद्याप हे स्पष्ट नाही केलं की केवळ आकडे लपणार आहेत की सोबत लाईक आणि रिपोस्टचे बटण देखील गायब होतील. हा बदल लागू केल्यानंतरच याबाबत माहिती मिळू शकणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT