amazon sakal
विज्ञान-तंत्र

Amazon shutting business in India: 'अॅमेझॉन'चा मोठा निर्णय; भारतातील तीन महत्वाच्या सेवा होणार बंद!

आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर अॅमेझॉन कंपनीनं हा निर्णय घेतला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : जगभरात सध्या आर्थिक मंदीचे ढग तयार व्हायला लागलेत. याचाच परिणाम म्हणून अनेक बड्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपातीचा सपाटाच लावला आहे. त्यातच आता ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज अमेरिकन कंपनी Amazonनं भारतातील आपले तीन बिझनेस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. (After food service Amazon now shutting another two business in India)

Amazonनं आता आपला डिस्ट्रीब्युशन बिझनेस बंद केला आहे. भारतात ही सेवा बंगळुरू, म्हैसुर आणि हुबळी या तीन शहरांमध्येच सुरु होती. या सेवेद्वारे व्होलसेल अर्थात घाऊक माल हा थेट छोट्या दुकानांना अथवा किराणा दुकानं, औषधांची दुकानं तसेच डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये पोहोचवण्यात येत होता. भारतातील अॅमेझॉनचा हा तिसरा बिझनेस बंद झाला आहे.

यापूर्वी अॅमेझॉननं आपली फूड डिलिव्हरी सेवा बंद करत असल्याची घोषणा केली होती. बंगळुरुमध्ये ही सेवा पायलट प्रोजेक्ट म्हणून सन २०२० मध्ये भारतात सुरु झाली होती. ही सेवा २९ डिसेंबर २०२२ पासून बंद होणार आहे. त्याचबरोबर अॅमेझॉन आपली एज्युटेक कंपनी असलेली अॅमेझॉन अॅकेडमी ही सेवा देखील ऑगस्ट २०२३पासून बंद करणार आहे. Amazonनं अॅमेझॉन अॅकॅडमी हा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म खास इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी सुरु केला होता, जे JEE सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत.

हेही वाचा - दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

अॅमेझॉनमध्ये २०२३ पर्यंत आणखी कर्मचारी कपात

दरम्यान, अॅमेझॉननं नुकतेच जगभरातील आपल्या १०,००० कर्मचाऱ्यांना कायमची सुट्टी दिली. कंपनीचे सीईओ अॅन्डी जेस्सी यांनी आपल्या अधिकृत निवेदनात म्हटलं की, येत्या काही महिन्यांमध्ये आणखी कर्मचाऱ्यांची कपात केली जाणार आहे. पण या कर्मचाऱ्यांना थेट काढून टाकण्यात येणार नाही. या कर्मचाऱ्यांना दुसऱ्या टीमसोबत काही आठवड्यांसाठी काम करण्याची संधी देणार आहे. तसेच कर्मचाऱ्यांना VSP योजनेंतर्गत स्वेच्छेनं राजीनामा देण्यास सांगण्यात येणार आहे. जे कर्मचारी VSP योजनेंतर्गत राजीनामा देतील त्यांना २२ आठवड्यांचं बेसिक पगार मिळेल. पुढील सहा महिने ते बावीस आठवडे एका आठवड्याचा बेसिक पगार मिळेल. तसेच वीम्याचा लाभही देण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

Latest Marathi News Live Update : मुंबईत कंत्राटदाराचा सातवा बळी, सरकारची ८६ हजार कोटींची थकबाकी

मोठा अनर्थ टळला... जुई गडकरीच्या विमानात बिघाड? कॅप्टनने वाचवलं, अभिनेत्रीच्या पोस्टने चाहते चिंतेत

SCROLL FOR NEXT