Disney+ Hotstar eSakal
विज्ञान-तंत्र

Disney+ Hotstar : नेटफ्लिक्सनंतर आता डिज्नी+हॉटस्टारचाही यूजर्सना दणका! पासवर्ड शेअरिंग केलं बंद

Password Sharing : याबाबत यूजर्सना ई-मेल पाठवण्यात आले आहेत.

Sudesh

नेटफ्लिक्सने काही दिवसांपूर्वीच भारतासह कित्येक देशांमध्ये आपली पासवर्ड शेअरिंग सिस्टीम बंद केली होती. यानंतर आता डिज्नी+हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मने देखील असाच निर्णय घेतला आहे. याबाबत यूजर्सना ई-मेल पाठवण्यात आले आहेत.

कॅनडामध्ये हा निर्णय लागू करण्यात आला आहे. एक नोव्हेंबरपासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या नियमाचं उल्लंघन करणाऱ्या यूजर्सचं अकाउंट रिस्ट्रिक्ट किंवा टर्मिनेट करण्यात येणार आहे.

पासवर्ड शेअरिंग ही समस्या ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी नवीन नाही. एकच अकाउंट कित्येक जणांमध्ये शेअर झाल्यामुळे या प्लॅटफॉर्म्सचं मोठं आर्थिक नुकसान होतं. यामुळेच नेटफ्लिक्सने देखील पासवर्ड शेअरिंगवर निर्बंध लागू केले आहेत.

डिज्नी+हॉटस्टार देखील नेटफ्लिक्सप्रमाणेच निर्बंध लागू करणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, पासवर्ड मित्रांमध्ये शेअर केला जातो आहे का हे पाहण्यासाठी कंपनी यूजर्सचे आयपी अ‍ॅड्रेस ट्रॅक करणार आहे. एकाच घरातील यूजर्सना पासवर्ड शेअर करता येतील, मात्र दोन वेगवेगळ्या आयपी अ‍ॅड्रेसवरुन एकाच पासवर्डने लॉग-इन करता येणार नाही.

भारतात होणार का लागू?

भारतात अशा प्रकारचे निर्बंध लागू केले जाणार की नाही याबाबत कंपनीने अद्याप स्पष्टीकरण दिलं नाही. मात्र, नेटफ्लिक्सने भारतात लागू केलेल्या निर्बंधांनंतर त्याला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहून, कंपनी आपली चाल ठरवू शकते. सध्या तरी भारतात अशा प्रकारचे निर्बंध नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : मुंबईतील १४ फुटांवरील झोपड्यांवरील कारवाईला राष्ट्रवादीचा विरोध

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT