AI Hanooman esakal
विज्ञान-तंत्र

AI Hanooman : भारतीय कंपनीने बनवले Hanooman AI, जाणून घ्या कसे करेल काम

अँड्रॉईड वापरकर्ते त्याचे मोबाइल ॲप देखील डाउनलोड करू शकतात.

सकाळ डिजिटल टीम

AI Hanooman :

AI च्या जगात नवीन नावे सतत ऍड होत आहेत. अल्पावधीतच AI चे जाळे जगभर पसरले आहे. या टेक्नॉलॉजीच्या मार्केटमध्ये भारतीय बनावटीचे Hanooman AI लाँच करण्यात आले आहे. ज्यामध्ये प्रत्येकजण प्रवेश करू शकतो.

Hanooman AI हा प्लॅटफॉर्म अबू धाबी स्थित AI इन्वेस्टमेंट फर्म 3AI होल्डिंग लिमिटेड आणि स्वदेशी कंपनी SML (सीता महालक्ष्मी हेल्थकेअर) यांनी विकसित केले आहे.

Hanooman AI ने पहिल्या वर्षात 20 कोटी वापरकर्त्यांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य ठेवले आहे. कंपनीला भारतात जनरेटिव्ह एआय इकोसिस्टम तयार करायची आहे. हनुमान AI ला भारतात स्थानिक भाषा आणि सामाजिक विविधतेसाठी काम करायचे आहे.

सध्या Hanooman AI मोफत आहे. तुम्हाला बेसिक व्हर्जन विनामूल्य मिळेल. कंपनी लवकरच त्याचे प्रीमियम व्हर्जन देखील लॉन्च करणार आहे. जे अनेक अडव्हान्स फिचरसह असणार आहे. हे अडव्हान्स फिचर कंपनी 2024 च्या शेवटी लॉन्च करू शकते. तुम्ही ते वेब आणि मोबाईल प्लॅटफॉर्मवर ॲक्सेस करू शकता.

अँड्रॉईड वापरकर्ते त्याचे मोबाइल ॲप देखील डाउनलोड करू शकतात. हे ॲप गुगल प्ले स्टोअरवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. तर iOS वापरकर्त्यांना हनुमान AI च्या ॲपची प्रतीक्षा करावी लागेल.

तुम्ही त्याचे वेब व्हर्जन कोणत्याही प्लॅटफॉर्मवर वापरू शकता. ते डाऊनलोड केल्यानंतर, तुम्हाला एक अकाऊंट तयार करावे लागेल. यासाठी तुम्ही तुमचा मोबाईल नंबर किंवा गुगल अकाउंट वापरू शकता. अकाऊंट तयार केल्यानंतर तुम्ही Hanooman AI ॲपवरून अनेक प्रश्न विचारू शकता.

हनुमान AI मध्ये तुम्हाला अनेक फीचर्स मिळतात. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्याचे अनेक भाषेवर असलेलं प्रभुत्व. या प्लॅटफॉर्मवर 98 भाषा फिड केलेल्या आहेत, त्यापैकी 12 भारतीय भाषा आहेत. या फिचरमुळे ते कम्युनिकेशनचे शक्तिशाली साधन बनते.

याशिवाय तुम्ही हनुमान AI चा वापर कंटेंट क्रिएशनमध्ये करू शकता. त्याच्या मदतीने तुम्ही मजकूर सहज लिहू शकता. हे AI टूल तुमच्याशी बोलूही शकते. तुम्ही व्हर्च्युअल असिस्टंट म्हणूनही वापरू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: नीरज चोप्राचे 'सुवर्ण' हुकले, Rumesh Pathirage ने मारली बाजी; पाकड्या अर्शद नदीमची लाज गेली, वाचा काय झालं...

TEJASWIN SHANKAR HISTORICAL MEDAL: तेजस्विन शंकरने इतिहास घडवला! खडतर अशा डेकॅथलॉन स्पर्धेत भारताला जिंकून दिले पहिले पदक

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

SCROLL FOR NEXT