AI Partner eSakal
विज्ञान-तंत्र

AI Partner : डेटिंग अ‍ॅप्स, सोशल मीडिया सोडा; आता एआयच्या मदतीने घडवा मनासारखा जोडीदार!

Perfect AI Partner : तुम्ही स्वतः तयार केलेल्या या एआय चॅटबॉट पार्टनरसोबत रोमँटिक गप्पा मारू शकाल.

Sudesh

Perfect Romantic Partner : परफेक्ट पार्टनर शोधणं हे गवतात सुई शोधण्यासारखं कठीण काम असतं. काही लोक यासाठी डेटिंग अ‍ॅप्सची मदत घेतात, तर काही जण सोशल मीडियाची. या प्रयत्नात इनबॉक्समध्ये 'जेवण झालं का?' असं विचारुन आतापर्यंत कितीतरी जणांनी आपली फजिती करुन घेतली आहे. मात्र, आता असं करायची गरज भासणार नाही.

याला कारण म्हणजे, आता एआयच्या मदतीने तुम्हाला तुमच्या आवडीचा पार्टनर तयार करता येणार आहे. म्हणजेच, आपल्या पार्टनरमध्ये तुम्हाला ज्या गोष्टी आवडतील, त्या एआय टूलला सांगून तुम्ही आपल्या पसंतीचा पार्टनर तयार करुन घेऊ शकता. (Romantic AI Partner)

अँड्रेसेन होरोविट्स नावाच्या कंपनीने याची सुरुवात केली आहे. या कंपनीला A16Z या नावानेही ओळखलं जातं. अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीमध्ये या कंपनीचं मुख्यालय आहे. तुमच्या पसंतीचा एआय पार्टनर कसा तयार करता येईल याची माहिती या कंपनीने गिटहबवर शेअर केली आहे.

असं करा कस्टमाईज

या कंपनीच्या एआय टूलमध्ये आपल्या आवडीनुसार पार्टनर तयार करण्यासाठी विविध प्रकारच्या पर्सनॅलिटी आणि बॅकग्राउंडचे पर्याय मिळतात. या पार्टनरची बॅकस्टोरी काय असेल, फॅमिली बॅकग्राउंड काय असेल याबाबत यूजर्सनी स्वतःच एआय टूलला इनपुट द्यायचं आहे. (Tech News)

अशा प्रकारे तुम्ही स्वतः तयार केलेल्या एआय चॅटबॉट पार्टनरसोबत रोमँटिक गप्पा मारू शकाल. सध्या हा प्रोजेक्ट अगदी सुरुवातीच्या टप्प्यात आहे. डेव्हलपर्सना चाचण्यांसाठी हा प्रोजेक्ट उपलब्ध करून देण्यात आला आहे. चाचण्या झाल्यानंतर हे टूल सामान्यांसाठी उपलब्ध करून दिलं जाऊ शकतं.

इतर कंपन्याही स्पर्धेत

रोमँटिक एआय पार्टनर बनवण्याच्या शर्यतीत केवळ Andreessen Horowitz ही एकच कंपनी नाही. रेप्लिका (Replika) नावाचा एक एआय प्लॅटफॉर्म देखील तुम्हाला तुमच्या आवडीनुसार एआय पार्टनर तयार करुन देतो. तर कित्येक कंपन्या प्री-मेड एआय मॉडेल्सही चॅटिंगसाठी उपलब्ध करुन देतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : रेल्वे पुलासाठी खोदलेल्या खड्ड्यात चार मुलं बुडाली; चौघांची प्रकृती चिंताजनक...यवतमाळमधील घटना, नेमकं काय घडलं?

Sachin Tendulkar: विनोद कांबळी सचिनपेक्षा खरंच भारी होता? भावानेच केला खुलासा; म्हणाला, 'तो असं कधीच...'

Dr. Trupti Agarwal: 'मुलं म्हणजे रिपोर्ट कार्ड नव्हे,' डॉ. त्रुप्ती अगरवाल यांचं नवं शैक्षणिक सूत्र

ST Bus conductor drunk : एसटी बसचा कंडक्टर दारूच्या नशेत धुंद; केबिनजवळ जाताच ड्रायव्हरनं...; पाहा VIDEO

Rain-Maharashtra Latest Live News Update: सीएसडीएसचे संजय कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT