airtel prepaid plans 
विज्ञान-तंत्र

Airtel चे ३ परवडणारे प्रीपेड प्लॅन; मिळते चांगली व्हॅलिडिटी अन् डेटा

सकाळ डिजिटल टीम

airtel prepaid plans : एअरटेल कंपनी दररोज डेटा बेनिफिट्ससह अनेक प्रीपेड रिचार्ज प्लॅन देत आहे. पण आपल्यापैकी बरेच जण डेली डेटा सोबतच जास्त दिवसांची व्हॅलिडिटी असलेले प्लॅन शोधत असतात. दरम्यान कंपनी 1 वर्षाच्या कालावधीसह मिळणारे प्लॅन खूप महाग आहेक, पण Airtel चे थोड्या कमी किमतीत मध्यम-मुदतीचे प्रीपेड रिचार्ज प्लॅन देखील ग्राहकांसाठी बेस्ट ठरु शकतात. या प्लॅनमध्ये, ग्राहकांना वैधतेसह इतर अनेक फायदे मिळतात. आज आपण Airtel च्‍या असेच 3 बेस्ट मध्यम-मुदतीचे प्रीपेड रिचार्ज प्‍लॅन जाणून घेणार आहोत.

एअरटेलचा 549 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

एअरटेलच्या 549 रुपयांच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना 56 दिवसांपर्यंत वैधता मिळते. फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, प्लॅनमध्ये दररोज 2 GB डेटा हाय-स्पीडवर उपलब्ध आहे. 56 दिवसांच्या वैधतेनुसार, तुम्हाला प्लॅनमध्ये एकूण 112 GB डेटाचा अ‍ॅक्सेस मिळेल. याशिवाय अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 मोफत एसएमएसची सुविधा या प्लॅनमध्ये दिली आहे.

एअरटेलचा 699 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

ज्या ग्राहकांना दररोज 2 जीबी डेटाची आवश्यकता आहे, ते 699 रुपयांचा प्लॅन निवडू शकतात. या प्लॅनमध्येही ग्राहकांना 56 दिवसांची वैधता मिळते. हा प्लॅन दररोज 3 GB हाय-स्पीड डेटा देतो. 56 दिवसांच्या वैधतेनुसार, तुम्हाला प्लॅनमध्ये एकूण 168 GB डेटाचा अ‍ॅक्सेस मिळेल. याशिवाय अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 मोफत एसएमएसची सुविधा या प्लॅनमध्ये दिली आहे. या प्लॅनमध्ये Amazon Prime चे मोफत सबस्क्रिप्शन देखील दिले जाते.

एअरटेलचा 839 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

जर तुम्ही 56 दिवसांपेक्षा जास्त कालावधीची वैधता शोधत असाल, तर एअरटेलचा 839 रुपयांचा प्लॅन तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. या प्लॅनमध्ये कंपनी ग्राहकांना 84 दिवसांची वैधता देते. प्लॅनच्या फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर, हा 549 रुपयांच्या प्लॅनसारखाच आहे, ज्यामध्ये दररोज 2 GB डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 मोफत एसएमएस दिलेले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT