airtel 5g rollout check 116 supporting smartphones list apple samsung xiaomi oppo oneplus realme vivo
airtel 5g rollout check 116 supporting smartphones list apple samsung xiaomi oppo oneplus realme vivo  google
विज्ञान-तंत्र

5G in India: 'या' 116 स्मार्टफोन्सना Airtel 5G करेल सपोर्ट, तुमचा फोन यादीत आहे का?

सकाळ डिजिटल टीम

एअरटेलने नुकतीच भारतातील आठ शहरांमध्ये 5G सेवा सुरू केली आहे. अर्थात, टेलिकॉम ऑपरेटरद्वारे प्रदान केलेली 5G सेवा केवळ 5G सपोर्ट करणाऱ्या डिव्हायसेसवर वापरली जाऊ शकते. अशा परिस्थितीत, कंपनीने 116 हँडसेटची यादी जारी केली आहे जे एअरटेलच्या नेटवर्कवर 5G कनेक्टिव्हिटीला सपोर्ट देतात. Apple, Samsung, Xiaomi, Oppo, OnePlus, Realme, Vivo आणि iQoo चे स्मार्टफोन या यादीत आहेत.

एअरटेलने कंपनीने ऑफर केलेल्या 5G नेटवर्कला सपोर्ट करणार्‍या 116 स्मार्टफोनची यादी जारी केली आहे. यामध्ये Apple , Samsung , Xiaomi , Oppo , OnePlus , Realme , Vivo , iQoo , Nothing , Infinix , Motorola , Asus , Google , Honor , Lava , LG , Nokia आणि Tecno चे स्मार्टफोन्स यांचा समावेश आहे.

यापैकी बर्‍याच ब्रँडच्या स्मार्टफोन्सना 5G सक्रिय करण्यासाठी सॉफ्टवेअर अपडेट्सची आवश्यकता असते, जे येत्या काही आठवड्यांत किंवा महिन्यांत रिलीज होण्याची अपेक्षा आहे. यामध्ये Apple iPhone 12 आणि त्यावरील, OnePlus 8 सीरीज, Oneplus Nord 2 आणि Oneplus 9R , 18 Samsung Galaxy स्मार्टफोन, 11 Motorola स्मार्टफोन, 7 Asus स्मार्टफोन, Google Pixel 6A , Honor 50 , Lava Agni , LG Wing , Nokia XR20,Pova 5G आणि Tecno चा समावेश आहे.

यासंबंधीची संपूर्ण यादी Airtel च्या वेबसाईटवर देण्यात आली आहे. यामध्ये तुम्ही तुमचा स्मार्टफोन देखील शोधू शकता.

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात सांगितले की, केंद्र सरकार 2 वर्षांच्या आत देशभरात 5G सेवा कव्हर करण्याचा मानस आहे.

तसेच रिलायन्स जिओनेही घोषणा केली आहे की ते या वर्षीच्या दिवाळीपर्यंत दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई सारख्या अनेक मोठ्या शहरांमध्ये हाय-स्पीड 5G टेलिकॉम सेवा सुरू करणार आहेत. त्यानंतर, कंपनी डिसेंबर 2023 पर्यंत देशभरातील प्रत्येक शहर, तहसील आणि तालुक्यात आपले 5G नेटवर्क विस्तारित करण्याची योजना आखत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरू - गुजरात येणार आमने-सामने; स्पर्धेतील आव्हान टिकवण्याचं दोन्ही संघांसमोर आव्हान

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

SCROLL FOR NEXT