Airtel New Recharge Plans airtel launches rs 489 509 recharge plans with 60gb 30 days validity rak94 Esakal
विज्ञान-तंत्र

Airtel New Recharge Plans : एअरटेलने लाँच केले दोन परवडणारे प्लॅन्स; मिळतो 60GB पर्यंत डेटा अन् बरंच काही

सकाळ डिजिटल टीम

Airtel New Recharge Plans : भारती एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी दोन नवीन प्रीपेड प्लॅन लाँच केले आहेत. एअरटेलच्या नवीन प्रीपेड प्लॅनमध्ये 60GB पर्यंत डेटा दिला जात आहे. एअरटेलच्या नवीन रिचार्ज प्लॅनमध्ये कंपनी अधिक डेटा देत आहे.

एअरटेलकडे अनेक अॅड-ऑन डेटा पर्याय आहेत परंतु फारच कमी प्लॅनमध्ये अधिकटा डेटा मिळतो. एअरटेलचे नवीन रिचार्ज प्लॅन 489 आणि 509 रुपयांच्या किमतीत लॉन्च करण्यात आले आहेत.

एअरटेलच्या 489 रुपयांच्या प्लॅनचे डिटेल्स

489 रुपयांच्या एअरटेल प्लॅनची ​​वैधता 30 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉलची सुविधा मिळते. याशिवाय या प्लॅनमध्ये 50GB डेटा देण्यात आला आहे. या प्लॅनमध्ये एकूण 300 एसएमएस देण्यात आले आहेत.

एअरटेल यूजर्सना या रिचार्ज प्लॅनसह इतरही अनेक फायदे मिळतात.या व्यतिरिक्त, हॅलो ट्यून्स, विंक म्युझिक, अपोलो 24|7 सर्कल सारखे फायदे देखील या प्लॅनमध्ये उपलब्ध आहेत.

एअरटेलच्या 509 रुपयांच्या प्लॅनचे डिटेल्स

509 रुपयांच्या एअरटेल रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना अमर्यादित व्हॉईस कॉल ऑफर केले जातात. म्हणजेच ग्राहक लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉल करू शकतात. या प्लॅनची ​​वैधता 30 दिवस म्हणजेच 1 महिना आहे.

या प्लॅनमध्ये 300SMS उपलब्ध आहेत. याशिवाय या प्लॅनमध्ये ग्राहकांना 60GB डेटा मिळतो. या व्यतिरिक्त, हॅलो ट्यून्स, विंक म्युझिक, अपोलो 24|7 सर्कल, या रिचार्ज पॅकमध्ये फास्टॅगवर कॅशबॅकचा लाभ देखील उपलब्ध आहे.

भारती एअरटेलने अलीकडेच अनेक प्रीपेड प्लॅन जाहीर केल्या आहेत. 5G समर्थित क्षेत्रातील एअरटेल ग्राहक या प्लॅनसह 5G स्पीड इंटरनेट वापरू शकतात. एअरटेल सध्या दिल्ली-एनसीआर, यूपी, हरियाणा, जम्मू आणि काश्मीर, आंध्र प्रदेश, बिहार, आसाम, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, झारखंड यासह अनेक राज्यांमध्ये 5G सेवा देत आहे .

99 रुपयांचा एअरटेलचा स्वस्त प्लॅन झाला बंद

Airtel ने अलीकडेच आपल्या सर्वात स्वस्त बेसिक प्लॅनच्या किमती 57 टक्क्यांनी वाढवल्या होत्या. एअरटेलने आता 99 रुपयांचा प्लॅन बंद केला आहे आणि आता एअरटेलचे प्लॅन 155 रुपयांपासून सुरू होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule: कर्जमाफी समिती लागली कामाला; चंद्रशेखर बावनकुळे, बच्चू कडू यांनी आंदोलनाची घाई करू नये

Power Bank Overuse: पॉवर बॅकचा अतिवापर फोनसाठी घातक, वेळीच काळजी घ्या! अन्यथा फोनची बॅटरी...

Nagpur Accident: नागपुरात रस्ते अपघातांत सर्वाधिक मृत्यू दुचाकीचालकांमुळे; ६९ अपघातांत ७८ जणांचा मृत्यू

Girish Mahajan : गिरीश महाजन आणि माणिकराव कोकाटे यांच्यातील प्रशासकीय संघर्ष तीव्र

Pune Crime : पुण्यात वाहतूक पोलिसानं गळफास घेऊन संपवलं जीवन; पत्नीनं अनेक वेळा फोन केला, शाळा सुटल्यावर मुलंही घरी परतली, पण..

SCROLL FOR NEXT