Airtel Prepaid Paln : दूरसंचार कंपनी एअरटेलने दोन नवीन प्रीपेड प्लॅन सादर केले आहेत. एअरटेलने ग्राहकांसाठी हे दोन्ही प्लॅन लॉन्च केले आहेत. एअरटेलच्या दोन नवीन प्लॅनची किंमत 519 रुपये आणि 779 रुपये असून दोन्ही एअरटेल प्रीपेड प्लॅन अमर्यादित व्हॉईस कॉलिंग, 1.5GB दैनंदिन हाय स्पीड डेटा, दररोज 100 SMS आणि काही इतर बेनिफिट्स देखील देतात. हे दोन्ही प्लॅन आधीच वेबसाइट आणि Airtel Thanks अॅपवर लिस्टेड आहेत. एअरटेलच्या या नवीन लाँच झालेल्या प्लॅन्सबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
एअरटेलचा 519 रुपयांचा प्लॅन
एअरटेलच्या 519 रुपयांच्या नव्या प्लॅनमध्ये 60 दिवसांची वैधता देण्यात आली आहे. व्हॉईस कॉलिंगबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग देण्यात आले आहे. तसेच या प्लॅनमध्ये दररोज 1.5GB डेटासह एकूण 90GB डेटा दिला जातो. या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस दिले जातात. यासोबत कंपनी एअरटेल थँक्स बेनिफीट्स देत आहे, ज्यात मोफत अपोलो 24|7 सर्कल मेंबरशीप, हॅलोट्यून्स, विंक म्युझिक आणि FASTag वर रु. 100 कॅशबॅक याचा समावेश आहे. हाय स्पीड डेली डेटा मर्यादा संपल्यानंतर इंटरनेट 64 Kbps च्या स्पीडने चालते.
एअरटेलचा 779 रुपयांचा प्लॅन
Airtelच्या 779 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 1.5GB हायस्पीड डेटा दिला जातो, जो एकूण 135GB डेटा आहे. हाय स्पीड डेली डेटा लिमीट संपल्यानंतर इंटरनेट 64 Kbps च्या वेगाने चालते. वैधतेबद्दल बोलायचे झाल्यास, याची वैधता 90 दिवसांची आहे. एसएमएसच्या बाबतीत, दररोज 100 एसएमएस, व्हॉईस कॉलिंगसाठी अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग उपलब्ध आहे. इतर फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये मोफत अपोलो 24|7 सर्कल मेंबरशीप, Hellotunes, Wink Music आणि Fastag वर रु. 100 कॅशबॅकचा याचा समावेश आहे.
एअरटेलचा 299 रुपयांचा प्लॅन
एअरटेलच्या 299 रुपयांच्या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉल उपलब्ध आहेत. या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस उपलब्ध आहेत. वैधतेबद्दल बोलायचे तर, या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. दररोज 1.5 GB डेटा देण्यात आला आहे. इतर फायद्यांमध्ये 3 महिन्यांच्या वैधतेसह अपोलो 24|7 सर्कल मेंबरशीप , HelloTunes, मोफत विंक म्युझिक,अपस्किल विद शॉ अकादमीचे 1 वर्षाचा फ्री ऑनलाइन कोर्स आणि FASTag वर रु. 100 कॅशबॅक यांचा समावेश आहे.
एअरटेलचा 479 रुपयांचा प्लॅन
एअरटेलच्या 479 रुपयांच्या प्लॅनमध्ये 56 दिवसांची वैधता देण्यात आली आहे. व्हॉईस कॉलिंगसाठी, या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉल देण्यात आले आहेत. तसेच दररोज 100 एसएमएस दिले जातात. इतर फायद्यांमध्ये 3 महिन्यांच्या वैधतेसह अपोलो 24|7 सर्कल मेंबरशीप, हॅलोट्यून्स, मोफत विंक म्युझिक, अपस्किल विद शॉ अकादमीचे 1 वर्षाचा फ्री ऑनलाइन कोर्स आणि FASTag वर रु. 100 कॅशबॅक यांचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.