Viral ‘All Eyes on Rafah’ image hides the true picture of violence in Palestine esakal
विज्ञान-तंत्र

Rafah Viral Photo : काय आहे All Eye on Rafah पाठीमागची संपूर्ण कहाणी? कोणी बनवला हा व्हायरल फोटो

Israel–Palestin conflict : वाक्याचा उद्देश आंतरराष्ट्रीय समुदायाला रफाहमधील परिस्थितीकडे डोळेझाक करू नये हे कळण्यासाठी

सकाळ डिजिटल टीम

Viral Photo : आजकाल सोशल मीडिया म्हणजे जगभरात कुठे काय सुरूय, भांडण तंटे, राजकारण, कोण कुणाबद्दल काय बोललं, का बोललं अश्या अनेक गोष्टी जाणून घ्यायचं ठिकाणच बनलं आहे. अश्यात सध्या सोशल मीडियावर एक ट्रेंड खूपच व्हायरल होताना दिसतोय. तो म्हणजे All Eye on Rafah. ट्रेंडच्या नावाखाली एक फोटो तुफान शेअर केला जात आहे. तर जाणून घेऊया नेमकं काय आहे हा फोटो व्हायरल होण्यामागचं कारण.

सोशल मीडियावर आठवड्याभरापासून All Eye on Rafah फोटो चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. यूजर्स इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर स्टोरीज आणि पोस्ट्सवर शेअर करत आहेत. यासोबतच अनेक सेलिब्रिटीही या मोहिमेत सहभागी झाले आहेत.

हा फोटो कोणी बनवला?

व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये Chaa.my_ वॉटरमार्क आहे. हा वॉटरमार्क @shahv4012 Instagram खात्याशी जोडलेला आहे, जो मलेशियातील एका छायाचित्रकाराचा आहे. अनेक लोक याच्यावर टीकाही करत आहेत. निषेधार्थ 7 ऑक्टोबरला तुमचे डोळे कुठे होते? ट्रेंड चालू आहे. ती म्हणजे, '२१ ऑक्टोबरला तुमचे डोळे कुठे होते?'

'ऑल आयज ऑन रफा' ही एक मोहीम आहे जी इस्रायली सैनिकांकडून गाझा शहरावर सुरू असलेल्या हल्ल्याकडे जगभरातील लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी सुरु करण्यात आली आहे.

खरं तर, या आठवड्याच्या सुरुवातीला रफाह कॅम्पमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात 45 नागरिकांचा मृत्यू झाला होता. यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. इस्रायलने हमासला लक्ष्य करण्यासाठी हा हवाई हल्ला केला. यानंतर जगभरातून इस्रायलला विरोध होत आहे. मात्र, इस्रायलने रफाह कॅम्पला लक्ष्य नकार दिला आहे.

प्रत्युत्तरादाखल तेल अवीवने एक छायाचित्र शेअर केले आहे, ज्यात हमासने इस्रायलवर गेल्या वर्षी ७ ऑक्टोबर रोजी केलेला हल्ला दाखवला आहे. या हल्ल्यात 1160 इस्रायली ठार झाल्याचा दावा केला जात आहे.

वाढता तणाव आणि दाट लोकवस्तीच्या रफाह शहरात इस्रायली सैन्याने केलेल्या जमिनीवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, 'ऑल आयज ऑन रफाह' (All Eyes On Rafah) या घोषणेसह मोहिमेला जगभरात लक्षणीय गती मिळाली आहे.

रफाहवरील ऑल आयचा फोटो सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटींनी शेअर केला आहे. आलिया भट्ट, वरुण धवन, माधुरी दीक्षितसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. सोशल मीडियावरही अनेक सेलिब्रिटींना टीकेला सामोरे जावे लागले आहे.

या वाक्याचा उद्देश आंतरराष्ट्रीय समुदायाला रफाहमधील परिस्थितीकडे डोळेझाक करू नये हे कळावे, जिथे अंदाजे 1.4 दशलक्ष लोकांनी हिंसक संघर्षातून इतरत्र पळून जाऊन गाझामध्ये आश्रय घेतला आहे.

इस्रायलवर टीका

या घटनेमुळे राष्ट्राध्यक्ष बिडेन यांच्यासह जगभरातील नेत्यांनी रफाहवरील हल्ल्यांबद्दल इस्रायलवर टीका केली आहे. यासोबतच अमेरिका इस्रायलला सुरक्षेसाठी शस्त्रे पुरवेल, मात्र रफाहवरील हल्ल्यात वापरण्यात येणारी शस्त्रे पुरवणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: नावडत्या भेंडीच्या भाजीवरून घर सोडले; आईशी घातला वाद; १७ वर्षीय मुलाने ट्रेनने गाठली दिल्ली

ENG vs IND,3rd Test: बुमराहने कॅच घेतला अन् सिराजने इंग्लंडच्या सलामीवीराच्या समोर जाऊन केलं आक्रमक सेलिब्रेशन; Video

Nagpur News: मान हॉटेलमधील कुंटणखान्यावर छापा; जबलपूर महामार्गावरील घटना, पीडितेची सुटका, ६० हजारांचा ऐवज जप्त

Latest Marathi News Updates :दोन गट हातात कोयता घेऊन आमनेसामने; पोलिसांच्या तत्परतेने अनर्थ टळला

Nagpur News : ऑनलाइन बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश; २० कोटींचे व्यवहा, छत्तीसगढ पोलिसांकडून नागपुरात सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT