Amazon-Flipkart Sale eSakal
विज्ञान-तंत्र

Amazon-Flipkart Sale : अमेझॉन आणि फ्लिपकार्टचे सेल एकाच दिवशी होणार सुरू; जाणून घ्या कोणत्या अन् किती असणार ऑफर्स?

Online Sales : अमेझॉन प्राईम आणि फ्लिपकार्ट प्लस मेंबर्सना या सेलचा एक दिवस आधीच अ‍ॅक्सेस मिळेल.

Sudesh

सध्या सणासुदीमुळे लोक मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. देशातील सर्वात मोठे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म असणाऱ्या अमेझॉन आणि फ्लिपकार्टनेही आपल्या मोठ्या सेलची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही सेल्स एकाच दिवशी सुरू होणार आहेत.

अमेझॉनचा 'ग्रेट इंडियन फेस्टिव्हल' आणि फ्लिपकार्टचा 'बिग बिलियन डेज' हे दोन्ही सेल 8 ऑक्टोबर रोजी सुरू होणार आहेत. अमेझॉन प्राईम आणि फ्लिपकार्ट प्लस मेंबर्सना या सेलचा एक दिवस आधीच अ‍ॅक्सेस मिळेल.

फ्लिपकार्टचा सेल हा 8 ते 15 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. तर अमेझॉनच्या सेलची शेवटची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, आतापर्यंतचे पॅटर्न पाहता अमेझॉनचा सेल देखील एक आठवड्यापर्यंत असेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कार्ड ऑफर्स

अमेझॉनवर SBI बँकेच्या कार्डवर 10 टक्के इन्स्टंट डिस्काउंट मिळत आहे. तर फ्लिपकार्टवर ICICI, Axis आणि Kotak या बँकांच्या कार्डवर 10 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळत आहे. याव्यतिरिक्त अतिरिक्त ऑफर्स देखील उपलब्ध असणार आहेत.

अमेझॉन ऑफर्स

अमेझॉनच्या या सेलमध्ये जवळपास सर्वच कॅटेगरीमध्ये मोठा डिस्काउंट मिळत आहे. अ‍ॅलन सोली, व्हॅन ह्युसेन आणि यूएसपीए अशा ब्रँड्सवर 84 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळेल. तर हार्पा, बिबा, मिस चेस अशा ब्रँड्सवर 86 टक्क्यांपर्यतची सूट मिळेल. मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये देखील मोठे डिस्काउंट्स देण्यात येणार आहेत.

फ्लिपकार्ट ऑफर्स

फ्लिपकार्टच्या यूजर्सना देखील सर्वच कॅटेगरीमध्ये बंपर डिस्काउंट मिळणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स, वुमेन्स वेअर आणि स्मार्टफोन्स या सर्व कॅटेगरींमध्ये 80 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळेल. तर, स्मार्टफोन्सवर एक लाख रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज ऑफर्स देखील मिळत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT