amazon
amazon 
विज्ञान-तंत्र

Amazon ने बदलला Icon; सोशल मीडियावर हिटलरच्या मिशीशी केली जात होती तुलना

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- ई-कॉमर्समधील बलाढ्य कंपनी अ‍ॅमेझॉनने (Amazon) आपले एक आयकॉन बदलले (Amazon App Icon) आहे. मोठ्या प्रमाणात झालेल्या विरोधानंतर कंपनीने तो बदलण्याचा निर्णय घेतला. काही लोकांनी या आयकॉनची तुलना हिटरलच्या मिशीसोबत (Adolf Hitler's moustache) केली होती. याची दखल घेत कंपनीने हे आयकॉन बदलले आहे. फॉक्स न्यूजच्या रिपोर्टनुसार, एडॉल्फ हिटलरच्या मिशीशी मिळते-जुळते आयकॉन असल्याची प्रतिक्रिया उमटत असल्याने अ‍ॅमेझॉनने निळी रिबिन बदलली आहे. कंपनीने जानेवारीमध्ये नव्या आयकॉनचे अनावरण केले होते. जुन्या शॉपिंग कार्ड आयकॉनला भुऱ्या रंगाच्या कार्डबोर्ड बॉक्समध्ये बदलण्यात आलं होतं. ज्यात समोरच्या भागात एक निळी रिबिन आणि त्याच्या खाली एक हास्याच्या आकाराचे अ‍ॅमेझॉनचे चिन्ह होते. विशेष म्हणजे गेल्या पाच वर्षातील अ‍ॅमेझॉन अ‍ॅपच्या आयकोनमधील पहिला बदल होता. 

निळ्या रिबिनच्या खाली असणाऱ्या टोका-टोकाच्या आकारामुळे सोशल मीडियावरील अनेक युझर्संना हिटलरच्या टूशब्रशसारख्या शैलीच्या मिशीची आठवण आणून दिली. अनेकांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अ‍ॅमेझॉनचा विरोध सुरु केला. तसेच आयकॉनला ट्रोल केलं गेलं. युझर्सच्या अशा प्रतिक्रियांमुळे अ‍ॅमेझॉनने चुपचाप निळ्या रंगाच्या रिबिनचा आकार बदलला आहे. नवीन बदल स्पष्णपणे दिसून येत आहे. शिवाय युझर्संनी आता याबाबतही प्रतिक्रिया देणे सुरु केले आहे. 

टूथब्रशसारखी मिशी चार्ली चॅपलिन आणि ओलिवर हार्डी सारख्या कॉमेडियनने ठेवली होती. त्यानंतर एडॉल्फ हिटलरची मिशीही अशाच प्रकारची होती. अ‍ॅमेझॉनच्या एका प्रवक्त्याने सीएएनला सांगितलं की, अ‍ॅमेझॉनने नवे डिझाईन्स बनवले आहेत. विशेष म्हणजे 2021 च्या सुरुवातीला ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Myntra नेही मुंबईमध्ये तक्रार दाखल झाल्यानंतर आपला लोगो बदलला होता. Myntra चा लोगो महिलांचा अवमान करणारा असल्याचा आरोप सोशल मीडियावर झाला होता. शिवाय याविरोधात कायदेशीर लढा लढला जात होता. त्यांनतर Myntra ने आपल्या लोगोमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT