Online Shopping Scam eSakal
विज्ञान-तंत्र

Online Shopping Scam : ऑनलाईन मागवला एक लाखांचा नवा लॅपटॉप; पण पार्सल उघडताच बसला धक्का.. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Amazon Scam : या व्यक्तीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे, की "अमेझॉनने माझी फसवणूक केली! मला आज अमेझॉनकडून 'नवा' लॅपटॉप मिळाला. मात्र हा आधीच कुणीतरी वापरलेला आहे.

Sudesh

Amazon Shopping Scam : ऑनलाईन शॉपिंगचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. लोक अगदी दररोजच्या वाण-सामान खरेदीसाठी देखील ऑनलाईन अ‍ॅप्सची मदत घेत आहेत. ऑनलाईन शॉपिंगवर ग्राहकांचा विश्वास बसलेला असतानाच, दुसरीकडे मात्र बऱ्याच वेळा ग्राहकांची फसवणूक झाल्याच्या घटनाही समोर येत असतात. असाच एक प्रकार सध्या चर्चेत आहे.

एका ग्राहकाने अमेझॉन या ई-कॉमर्स वेबसाईटवरुन 1 लाख रुपयांचा नवा लॅपटॉप खरेदी केला होता. मात्र, हा लॅपटॉप जेव्हा घरी पोहोचला तेव्हा त्या ग्राहकाच्या आनंदावर विरजण पडलं. कंपनीने त्याला नवीन लॅपटॉपऐवजी जुना वापरलेला लॅपटॉप पाठवला होता. या सर्व प्रकाराचा व्हिडिओ त्याने आपल्या एक्स हँडलवरुन शेअर केला आहे.

अमेझॉनने केली फसवणूक

या व्यक्तीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे, की "अमेझॉनने माझी फसवणूक केली! मला आज अमेझॉनकडून 'नवा' लॅपटॉप मिळाला. मात्र हा आधीच कुणीतरी वापरलेला आहे. याची वॉरंटी देखील 2023 च्या डिसेंबर महिन्यातच सुरू झालेली आहे." या पोस्टमध्ये या व्यक्तीने अमेझॉन इंडिया आणि लिनोव्हो कंपनीला देखील टॅग केलं आहे.

नेटिझन्स झाले नाराज

या पोस्टवर अमेझॉन हेल्पने प्रतिक्रिया दिली आहे. ग्राहकाला आलेल्या या अनुभवाबद्दल दिलगिरी व्यक्त करत त्यांनी एका लिंकवर तक्रार नोंदवण्यास सांगितलं आहे. मात्र इतर नेटिझन्स अमेझॉनवर अगदीच नाराज झालेले दिसतंय. या पोस्टच्या कमेंटमध्ये कित्येकांनी अमेझॉनला हा अक्षम्य हलगर्जीपणा असल्याचं म्हणत जाब विचारला आहे. तसंच लवकरात लवकर हा वापरलेला लॅपटॉप परत न्या आणि त्या व्यक्तीला नवीन लॅपटॉप द्या असंही कित्येक यूजर्सनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारत-पाकिस्तानमध्ये तणाव पुन्हा वाढला; शहबाज शरीफांचा भारताला थेट इशारा, उमर अब्दुल्लांनीही पाकला सुनावलं

Independence Day Wishes in Marathi: "झंडा ऊँचा रहे हमारा..." स्वातंत्र्यदिनानिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या खास मराठी शुभेच्छा आणि देशभक्तीपर संदेश!

Red Fort Flag Hoisting: भारताच्या 'या' दोन पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर तिरंगाच फडकावला नव्हता; काय आहे इतिहास?

IPL: हार्दिक पंड्याला KKRची खुली ऑफर? माजी खेळाडू म्हणाला, ‘या’ संघात मिळेल नेतृत्वाची जबाबदारी; IPL 2027 आधी मोठ्या ट्रेडची चर्चा

Marathi News Live Updates : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मोठी घोषणा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू स्थापन करणार नवा राजकीय पक्ष

SCROLL FOR NEXT