Gaming Laptop Sale eSakal
विज्ञान-तंत्र

Gaming Laptop Sale : अमेझॉनवर गेमिंग लॅपटॉपसाठी किकस्टार्टर डील्स सुरू, मिळतोय तगडा डिस्काउंट

Amazon Sale : अमेझॉनवर आठ ऑक्टोबरपासून ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल सुरू होणार आहे.

Sudesh

अमेझॉनवर आठ ऑक्टोबरपासून ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल सुरू होणार आहे. मात्र, या सेलच्या आधीपासूनच कंपनीने गेमिंग लॅपटॉपसाठी किकस्टार्टर डील्स सुरू केल्या आहेत. यामध्ये कित्येक तगडे लॅपटॉप दमदार डिस्काउंटवर उपलब्ध आहेत.

या डील्स खरंतर सप्टेंबर अखेर पासूनच सुरू झाल्या आहेत. एसर, आसुस आणि लिनोव्हो या कंपन्यांच्या ठराविक गेमिंग लॅपटॉपवर यात डिस्काउंट मिळत आहे. या लॅपटॉपचे फीचर्स आणि त्यावर मिळणारी सूट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

लिनोव्हो

Lenovo Ideapad Gaming 3 या गेमिंग लॅपटॉपमध्ये AMD Rayzen 5 6600 H प्रोसेसर देण्यात आला आहे. यामध्ये 15.6 इंच मोठी FHD स्क्रीन देण्यात आली आहे. याचा रिफ्रेश रेट 120HZ आहे. यामध्ये 8GB रॅम आणि 512GB SSD स्टोरेजचा पर्याय मिळतो. यामुळे हा लॅपटॉप अगदी फास्ट आणि स्मूद चालतो. डिस्काउंटनंतर याची किंमत सध्या 55,990 रुपये आहे. एसबीआय क्रेडिट कार्डचा वापर केल्यास यात आणखी 1500 रुपयांची सूट मिळू शकते.

आसुस

ASUS TUF Gaming F15 या गेमिंग लॅपटॉपमध्ये देखील 15.6 इंच मोठा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये इंटेल i5 11th जनरेशन प्रोसेसर आहे. यासोबत या लॅपटॉपमध्ये गेमिंगसाठी खास RTX 3050 4GB ग्राफिक्स गेमिंग कार्ड दिलं आहे. यामध्ये 8GB रॅम आणि 512GB SSD स्टोरेजचा पर्याय मिळतो. याची किंमत 58,990 रुपये आहे. यावर 1,500 रुपयांचा कार्ड डिस्काउंट आणि नो-कॉस्ट ईएमआय हे पर्यायही मिळतील.

एसर

Acer Aspire 5 या लॅपटॉपमध्ये इंटेल i5 12th जनरेशन प्रोसेसर देण्यात आलेला आहे. यामध्ये 12GB रॅम आणि 512GB SSD स्टोरेजचा पर्याय मिळतो. यात FHD डिस्प्ले, RTX2050 ग्राफिक्स कार्ड असे फीचर्स देखील मिळतात. याची किंमत 49,990 रुपये आहे. तसंच एसबीआय क्रेडिट कार्डचा वापर केल्यास यात आणखी 1500 रुपयांची सूट मिळू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT