Amazon Sale Record eSakal
विज्ञान-तंत्र

Amazon Sale : अमेझॉनचा ऐतिहासिक सेल! 100 कोटींहून अधिक नागरिकांचा सहभाग; 80 टक्क्यांहून अधिक ग्राहक छोट्या शहरांतील

Great India Festival Sale : या सेलमध्ये देशातील 99.7 टक्के पिनकोडवर राहणाऱ्या यूजर्सनी अमेझॉनच्या वेबसाईटला भेट दिली.

Sudesh

अमेझॉनचा वर्षातील सर्वात मोठा ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल नुकताच संपला आहे. 8 ऑक्टोबर रोजी या सेलला सुरूवात झाली होती. यानंतर महिनाभरात या सेलमध्ये तब्बल 1.1 बिलियन लोकांनी अमेझॉनच्या प्लॅटफॉर्मला भेट दिली. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा रेकॉर्ड असल्याचं कंपनीने म्हटलं आहे.

या सेलमध्ये देशातील 99.7 टक्के पिनकोडवर राहणाऱ्या यूजर्सनी अमेझॉनच्या वेबसाईटला भेट दिली. तर शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांपैकी तब्बल 80 टक्के ग्राहक हे टियर 2 आणि टियर 3 शहरांतून होते. यामध्ये जालंधर, कोल्हापूर, विशाखापट्टणम अशा टियर 2 शहरांचा समावेश होता. बिझनेस टुडेने याबाबतचा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे.

छोट्या शहरांमध्ये मोठी विक्री

गेल्या वर्षीच्या तुलनेत अमेझॉनने यावर्षी 2.5 पट अधिक स्मार्टफोन विक्री नोंदवली. यातील 70 टक्क्यांहून अधिक ग्राहक टियर 2 आणि टियर 3 शहरांतील होते. इलेक्ट्रॉनिक वस्तू मागवणारे 5 पैकी 3 ग्राहक या शहरांतील होते. ब्युटी प्रॉडक्ट्स मागवणारे 60 टक्क्यांहून अधिक ग्राहक देखील छोट्या शहरांतील होते.

अमेझॉन फॅशन या सेक्शनमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 3 पट अधिक विक्रीची नोंद झाली. तर 55 इंचांहून अधिक मोठ्या स्क्रीनच्या टीव्हींच्या विक्रीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 50 टक्क्यांनी वाढ झाल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे.

विक्रेतेही छोट्या शहरांतील

केवळ ग्राहकच नाही, तर या सेलमध्ये विक्रेतेदेखील छोट्या शहरांमधील होते. सुमारे 65 टक्क्यांहून अधिक विक्रेतेदेखील टियर 2 आणि टियर 3 शहरांतील होते. तसंच या शहरांतील 65 टक्क्यांहून अधिक ग्राहक हे प्राईम मेंबर्स होते, असंही कंपनीच्या अहवालात स्पष्ट झालं आहे.

लहान आणि मध्यम उद्योगांच्या विक्रीमध्ये या सेलदरम्यान 35 टक्के वाढ दिसून आली. 38,000 हून अधिक विक्रेत्यांनी एका दिवसातील सर्वाधिक विक्रीची नोंद केली. 750 हून अधिक विक्रेत्यांनी कोट्यवधींचा खप नोंदवला, तर 31 हजारांहून अधिक विक्रेत्यांनी लाखोंचा खप नोंदवला. (Tech News)

40 लाखांहून अधिक नवे ग्राहक

अमेझॉन इंडियाने सांगितलं, की या सेलमध्ये सुमारे 1.1 बिलियन, म्हणजे 110 कोटी भारतीयांनी अमेझॉनच्या वेबसाईट आणि अ‍ॅपला भेट दिली. यावेळी सेलच्या पहिल्या 48 तासांमध्ये आतापर्यंतच्या सर्वाधिक प्राईम साईन-अप्सची नोंद झाली. तर या सेलमध्ये 40 लाखांहून अधिक नव्या ग्राहकांची नोंद करण्यात आली.

सर्वात फास्ट डिलिव्हरी

प्राईम मेंबर्सनी मागवलेल्या वस्तूंपैकी सुमारे 50 टक्के वस्तू या पेमेंट केल्यानंतर 48 तासांच्या आत त्यांना डिलिव्हर झाल्या होत्या. या सेलमध्ये प्रत्येक 4 ऑर्डरमागे एका ऑर्डरची पेमेंट EMIने झाली. तसंच अमेझॉन पे-लेटचे यूजर्स गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 2.4 पटींनी वाढले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Politics: मतांसाठी उमेदवार घासत आहेत भांडी; पश्‍चिम बंगालमध्‍ये नवा फंडा; सभांपेक्षा मतदारांशी ‘जवळीक’ महत्त्वाची..

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT