amazon Sakal
विज्ञान-तंत्र

Amazon Pay : 'Amazon Pay' वर तुमचेही पैसे अडकलेत? 'या' टिप्सने करता येतील बँकेत ट्रान्सफर

सकाळ डिजिटल टीम

How To Transfer Money From Amazon Pay To Bank Accout : सध्या ऑनलाइन शॉपिंग अॅप अॅमेझॉनचा वापर ट्रेंडिगमध्ये आहे. खेरदीसाठी अनेकजण Amazon Pay चादेखील वापर करतात. यामुळे प्रत्येकवेळी बँकेच्या कार्डवरून पेमेंट करण्याची कटकट कमी होते.

हेही वाचा : विमा पाॅलिसींचे डी-मॅट पाॅलिसीधारकांनाच पोहचवेल नुकसान?

कार्ड किंवा बँक डिटेल्स न टाकता बिल पे करण्यासाठी Amazon Pay Wallet मध्ये काही रक्कम शिल्लक ठेवावी लागते. मात्र, अनेकदा आपण अनेक दिवस खरेदी करत नाही किंवा अचानक आपल्याला पैशांची गरज भासते. परंतु, Amazon Pay Wallet मधील पैसे एकदा टाकल्यानंतर ते काढता येत नाही. मात्र, आज आम्ही तुम्हाला Amazon Pay Wallet मधील शिल्लक पैसे बँक खात्यात कशाप्रकारे ट्रान्सफर करता येतील याबद्दल माहिती सांगणार आहोत.

कशी कराल Amazon Pay वरील शिल्लक बँक खात्यात ट्रान्सफर

Amazon Pay वरील शिल्लक रकमक तुमच्या बँक खात्यात ट्रान्सफर करण्यासाठी तुमचे बँक खाते KYC पूर्ण असणे आवश्यक आहे. जर तुम्ही केवायसी केलेले असेल, तर, Amazon Pay वरील शिल्लक रक्कम तुम्ही अगदी सहज बँक खात्यात ट्रान्सफर करू शकाल.

कसे कराल पैसे ट्रान्सफर

  • सर्वात पहिले मोबाईलवर Amazon अॅप उघडा.

  • यानंतर अॅपमधील Amazon Pay ऑप्शनवर क्लिक करा.

  • येथे तुम्हाला Send money चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.

  • यानंतर बँक आयकॉनवर क्लिक करून पुढे जा.

  • येथे तुम्हाला IFSC कोडसह बँक खात्याची माहिती भरावी लागेल.

  • येथे Pay Now बटणावर क्लिक करून किती पैसे ट्रान्सफर करायचे याची माहिती द्या.

  • यानंतर स्क्रीनवर एक पॉपअप पर्याय उघडेल, ज्यामध्ये Amazon Pay द्वारे पे बॅलन्स दाखविला जाईल. त्यावर क्लिक करून पेमेंट पूर्ण करा.

  • वरील स्टेप्स पूर्ण केल्यानंतर आता तुम्ही तुमच्या बँक खात्यातील शिल्लक तपासू शकता.

पण, जर तुम्ही बँकेत KYC पूर्ण केलेले नसेल तर, तुम्हाला यासाठी बँकेत जावे लागेल. केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कागदपत्र म्हणून आधार कार्ड गरजेचे आहे. केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्ही Amazon Pay च्या या सुविधेचा लाभ घेऊ शकणार आहात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

M Phil Professors : १४२१ प्राध्यापकांना मिळाला दिलासा! एम. फिल धारक प्राध्यापकांना अखेर नेट/सेटमधून सूट

Latest Maharashtra News Live Updates: मराठीत बोललो तर माध्यम माझी भावना सर्व महाराष्ट्रातील लोकांना लाईव्ह दाखवतील - फडणवीस

Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णय

Pune News : तीन वर्षात टाकली केवळ ९ किलोमीटरचीच सांडपाणी वाहिनी; प्रशासनाने टोचले ठेकेदाराचे कान

Monsoon Session: तुकडेबंदी कायदा रद्द! पुढे कशी असेल कार्यप्रणाली? 'त्या' जमिनींना नियमातून वगळले

SCROLL FOR NEXT