Amazon Sale iPhone eSakal
विज्ञान-तंत्र

Amazon Sale iPhone : सेल सुरू व्हायच्या आधीच संपला आयफोनचा स्टॉक? कित्येक लोकप्रिय मॉडेल झाले गायब

Amazon Sale : अमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलची सुरुवात आजपासून झाली आहे.

Sudesh

अमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलची सुरुवात आजपासून झाली आहे. मात्र, अमेझॉन प्राईम मेंबर्सना 7 ऑक्टोबरपासूनच या सेलचा अ‍ॅक्सेस मिळाला आहे. या सेलमध्ये आयफोनवर सर्वात मोठा डिस्काउंट मिळत आहे. मात्र, आज सेल सुरू झाल्यानंतर लगेच आयफोनचे कित्येक मॉडेल्स आउट ऑफ स्टॉक दिसून आले.

रविवारी रात्री 12 वाजता हा सेल सर्वांसाठी खुला झाला. मात्र, यानंतर केवळ दोन ते तीन तासांमध्येच आयफोन 14 आणि आयफोन 15 सीरीज आउट ऑफ स्टॉक झाली. तर, आयफोन 13चे देखील काहीच व्हेरियंट्स शिल्लक राहिले होते.

अमेझॉनवर iPhone 13, 14 आणि 15 वर आतापर्यंतचा सर्वाधिक डिस्काउंट मिळत आहे. 14 आणि 15 या सीरीज नवीन असल्यामुळे त्यावर जास्त सूट मिळत नाहीये. मात्र, आयफोन 13 हा सर्व ऑफर्स लागू केल्यानंतर सुमारे 40 ते 45 हजारांपर्यंत मिळत आहे. यामुळेच या फोनवर लोक तुटून पडत आहेत.

आयफोन 14 आणि आयफोन 15 वर मिळत असलेल्या इएमआय ऑप्शनमुळे देखील या मॉडेल्सच्या विक्रीत वाढ झाली आहे. सेलचा स्टॉक लिमिटेड आहे, आणि प्राईम मेंबर्सना आधीच अ‍ॅक्सेस मिळाल्यामुळे कित्येक स्मार्टफोन आउट ऑफ स्टॉक जात आहेत.

ज्या मॉडेल्सचा स्टॉक संपला आहे ते पुन्हा उपलब्ध होणार आहेत की नाही याबाबत अद्याप अमेझॉनने कोणतीही माहिती दिली नाही. मात्र, पुढील आठवडाभर हा सेल सुरू राहणार असल्यामुळे टप्प्या-टप्प्याने स्टॉक उपलब्ध केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT