amezon prime 
विज्ञान-तंत्र

Amazon Prime Video ची मोठी ऑफर; 28 दिवसांसाठी स्वस्तातला प्लॅन लाँच

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे थिएटर्स बंद करण्यात आली होती. यावेळी घरीच अडकून पडलेले लोक मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन दिसायला लागले. यातच मनोरंजनासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मकडे प्रेक्षक वळले. याच पार्श्वभूमीवर कंटेंट स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म कंपन्यांनी अनेक ऑफर्स दिल्या आहेत..

भारतात अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशन बुधवारी लाँच केलं आहे. हा प्लॅन युजर्सना महिन्याला 89 रुपयांमध्ये मिळणार आहे. अमेझॉन प्राइम व्हिडिओने ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स, हॉटस्टार सारख्या कंपन्यांशी असलेल्या स्पर्धेत ही सेवा सुरु केली आहे. यासाठी अ‍ॅमेझॉनने एअरटेलसोबत टायअप केलं आहे.

एअरटेलच्या प्रीपेड युजर्सना याचा फायदा घेता येतो. तसंच एअरटेलचे युजर्स 30 दिवसांपर्यंत प्राइम व्हिडिओच्या फ्री ट्रायलचा आनंद घेऊ शकतात. फ्री सब्सक्रिप्शन मिळण्यासाठी ग्राहकांना एअरटेलचे थँक्स अ‍ॅप वापरावे लागेल. 

अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओचे संचालक आणि भारतातील जनरल मॅनेजर गौरव गांधी यांनी सांगितलं की, स्मार्टफोन मनोरंजनासाठी परवडणारं माध्यम बनलं आहे. स्मार्टफोनच्या माध्यमातून जास्ती जास्त युजर्सपर्यंत पोहोचण्यासाठी हा प्लॅन लाँच करण्यात आला आहे. 

सध्या अ‍ॅमेझॉनची स्पर्धा नेटफ्लिक्सशी आहे. नेटफ्लिक्सने 2020 मध्ये मोबाइलसाठी एक सबस्क्रिप्शन प्लॅन लाँच केला होता. भारतात 199 रुपयांमध्ये मोबाइल सबस्क्रिक्शनचा प्लॅन दिला होता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

राजकुमार रावचं झालं प्रमोशन! अभिनेता होणार बाबा; पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज

SCROLL FOR NEXT