गुगलने Android 13 लाँच केले आहे, ही Android ऑपरेटिंग सिस्टमची नवीनतम आवृत्ती आहे, मात्र ती सध्या फक्त Google Pixel फोनसाठी उपलब्ध केली जात आहे. Google ने म्हटले आहे की Android 13 अपडेट लवकरच Samsung Galaxy, Asus, HMD (Nokia), iQOO, Motorola, OnePlus, Oppo, Realme, Sharp, Sony, Tecno, Vivo, Xiaomi आणि इतर फोनवर या वर्षी रोल आउट होईल. या वर्षी मे मध्ये, Google ने Google I/O 2022 इव्हेंटमध्ये Android 13 ची पहिली झलक दाखवली होती. चला जाणून घेऊया Android 13 च्या काही खास फीचर्सबद्दल...
अँड्रॉइड 13 चे फीचर्स
अँड्रॉइड13 मध्ये डिझाइनमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. अँड्रॉइड13 मुळे वापरकर्ते त्यांचे कोणतेही Google व्यतिरीक्त अॅप कस्टमाइझ करु शकतील. नवीन अपडेटसह, तुम्हाला अॅप आईकन आणि वॉलपेपर कस्टमाईज करण्यासाठी अधिक पर्याय मिळतील. पूर्वी, एखादी भाषा बदलून संपूर्ण फोनची भाषा बदलायची पण आता अँड्रॉइड13 सह, विशिष्ट अॅपची भाषा आणि फॉन्ट आकार बदलण्याचा पर्याय असेल. अँड्रॉइड13 सह, नवीन वॉलपेपरसह कस्टमाईज झोपण्याची वेळ आणि डार्क मोड मिळेल. तसेच Pixel फोनला spatial ऑडिओसाठी सपोर्ट मिळेल, जो आधीपासून iPhone मध्ये आहे. नवीन OS ब्लूटूथसाठी लो एनर्जी (LE) ऑडिओ देखील वापरेल.
अँड्रॉइड13 मध्ये गुगलने युनिफाइड सिक्युरिटी आणि प्रायव्हसी सेटिंग्ज पेज व्यतिरिक्त अल्बममध्ये आर्टवर्क देखील दिले आहे. टॅब्लेटसाठी Android 13 देखील ऑप्टिमाइझ केले गेले आहे जेणेकरून मल्टीटास्किंगमध्ये कोणतीही अडचण येणार नाही. त्याचे अंतिम अपडेट ऑगस्टमध्ये जारी केले जाऊ शकते.
Android 13 मध्ये म्युझीक लॉक स्क्रीनवर देखील प्ले करता येईल. याशिवाय भूकंपांबाबत पूर्वीपेक्षा अचूक इशारेही मिळतील. भूकंपाच्या अलर्टसोबतच ते टाळण्याचे उपायही सांगण्यात येणार आहेत. Google Pay च्या डिझाइनमध्ये Google Wallet देखील बदलण्यात आले आहे, त्यानंतर तुम्ही इव्हेंट पास, पेमेंट कार्ड, विमा इत्यादी स्टोर करू शकाल.
स्मार्ट ट्रांसलेशन
कंपनीने Google Translate संदर्भात एक मोठे अपडेट जारी केले आहे. आता तुम्ही गुगलवर संस्कृत आणि भोजपुरीमध्ये भाषांतर करू शकाल. नवीन अपडेटनंतर गुगल ट्रान्सलेटमध्ये संस्कृत आणि भोजपुरीसह आठ नवीन भाषा जोडल्या गेल्या आहेत. नवीन अपडेटनंतर, Google मध्ये, तुम्हाला संस्कृत, आसामी, भोजपुरी, डोगरी, कोकणी, मैथिली, मिझो आणि मेइटिलॉन (मणिपुरी) मध्ये भाषांतर करता येईल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.