Astronaut Who Captured Iconic 'Earthrise' Photo, William Anders, Dies in Crash esakal
विज्ञान-तंत्र

Astronaut William Anders : अंतराळातील 'Earthrise' फोटोच्या शिल्पकाराने घेतला जगाचा निरोप; अंतराळवीर विल्यम अँडर्सचे हवाई दुर्घटनेत निधन

Earthrise Astronaut : Apollo ८ मिशनमध्ये होता धोका, देशभक्ती आणि संशोधनासाठी अँडर्सनी घेतला होता पुढाकार

Saisimran Ghashi

Apollo 8 : सध्या अंतराळाच्या अनेक मोहीम सुरु आहेत. ज्यामध्ये नासाचे मिशन,जपानचे लाकडी उपग्रह आणि चीनचे चंद्रावरचे मिशन असे अनेक मिशन झाले आहेत.अश्यातच अंतराळाशी संबंधित एका प्रतिष्ठित व्यक्तीचे दुःखद निधन झाले आहे.

अंतराळातील प्रसिद्ध "Earthrise" छायाचित्र घेणारे आणि अपोलो ८ मिशनमधील अंतराळवीर विल्यम अँडर्स यांचे ९० व्या वर्षी हवाई दुर्घटनेत निधन झाले. वॉशिंग्टनच्या सॅन जुआन बेटकडे विमान चालवत असताना ही दुर्घटना घडली. त्यांचा मुलगा ग्रेग अँडर्स यांनी ही दुःखद बातमी दिली.

"Earthrise" या पृथ्वीचा निळा गोळा दाखवणारा हा iconic फोटो १९६८ मध्ये अँडर्स यांनीच टिपला होता. या छायाचित्रामुळे पृथ्वीकडे बघण्याचा मानवी दृष्टिकोनच बदलून गेला. या फोटोला पर्यावरण आणि तत्वज्ञानावर मोठा प्रभाव टाकला होता.अँडर्स यांनी या छायाचित्रालाच आपले अंतराळ कार्यक्रमातील सर्वात महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे म्हटले होते.

अपोलो ८ मिशन दरम्यान अंतराळयानाचे नियंत्रण यंत्रणा सुव्यवस्थित चालवण्यासाठीही त्यांची भूमिका मोठी होती. १९९७ च्या मुलाखतीत त्यांनी या मिशनमध्ये धोका असूनही राष्ट्रीय, देशभक्ती आणि संशोधन या कारणांसाठी ते करणे आवश्यक होते, असे ते म्हणाले होते.

अपोलो 8, मूलतः 1969 साठी नियोजित होते, 1968 च्या अखेरीस रशियन लोक चंद्राभोवती त्यांच्या स्वत: च्या योजनांना गती देत ​​होते या चिंतेमुळे पुढे ढकलले गेले. यामुळे क्रूला ऐतिहासिक परंतु अत्यंत जोखमीच्या मोहिमेसाठी प्रशिक्षण देण्यासाठी फक्त काही महिने मिळाले,असे मत त्यांनी व्यक्त केले होते.

अंतराळवीर विल्यम अँडर्स यांचे दुःखद हे स्पेस क्षेत्रातील मोठे नुकसान आहे अश्या प्रतिक्रिया व्यक्त आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

श्रीसंतला मोठा दिसाला! KCA ने घातलेली तीन वर्षांची बंदी उठवली, नेमका काय होता आरोप?

दारुबंदीसाठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीने शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

Latest Marathi News Live Update : पुण्यात रिमझिम पावसानेच झाड कोसळलं

SCROLL FOR NEXT