Apollo Group Asteroid eSakal
विज्ञान-तंत्र

Apollo Group Asteroid : आज पृथ्वीच्या जवळून जाणार विशाल लघुग्रह; 55,243 किलोमीटर प्रतितास वेगाने करतोय प्रवास!

हा लघुग्रह अपोलो ग्रुप अ‍ॅस्टेरॉईडपैकी एक आहे.

Sudesh

अंतराळातून कित्येक लघुग्रह प्रवास करत असतात. यामधील कित्येक लघुग्रह पृथ्वीला धडकण्याची देखील शक्यता असते. असाच एक विशाल लघुग्रह आज (25 ऑक्टोबर) पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार आहे. नासाने याबाबत माहिती दिली आहे.

हा लघुग्रह अपोलो ग्रुप अ‍ॅस्टेरॉईडपैकी एक आहे. याचं नाव Asteroid 2023 UF6 असं आहे. एका मोठ्या विमानाच्या आकाराचा हा लघुग्रह तब्बल 55,243 किलोमीटर प्रतितास वेगाने पृथ्वीच्या जवळून जाईल. पृथ्वीपासून हा सुमारे 30 लाख किलोमीटर दूरून निघून जाणार आहे. याचा आकार आणि पृथ्वीपासूनचे अंतर पाहता हा लघुग्रह धोकादायक नसल्याचं नासाने स्पष्ट केलं आहे.

पृथ्वीच्या जवळ असणाऱ्या लघुग्रहांच्या एका समूहाला 'अपोलो ग्रुप' असं नाव देण्यात आलं आहे. 1862 Apollo या मोठ्या लघुग्रहाच्या नावावरुन संपूर्ण समूहालाच ते नाव देण्यात आलं आहे. जर्मन खगोलशास्त्रज्ञ कार्ल रेईनमथ यांनी 1930 साली अपोलो लघुग्रहाचा शोध लावला होता.

नासाने दिलेल्या माहितीनुसार, हा उपग्रह यानंतर भविष्यात हा लघुग्रह पुन्हा एकदा पृथ्वीजवळून जाईल. 22 एप्रिल 2028 रोजी पृथ्वीपासून सुमारे सात कोटी किलोमीटर अंतरावरुन हा लघुग्रह जाऊ शकतो.

दुसरीकडे, 2175 ते 2195 या सालादरम्यान पृथ्वीच्या जवळून बेन्नू नावाचा एक महाकाय लघुग्रह जाऊ शकतो. हा लघुग्रह पृथ्वीला धडकण्याचीही शक्यता आहे. त्यामुळेच याला नष्ट करण्याच्या दृष्टीने नासाने योजना आखण्यास सुरुवात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! ग्रामपंचायतींचा नोव्हेंबरअखेर वाजणार बिगुल? सरपंच आरक्षण जाहीर, आता सदस्यांची आरक्षण सोडत १२ जूनला; मतदार यादी ‘या’ महिन्यात होणार अंतिम

येत्या जून महिन्यात बनतोय अत्यंत खतरनाक खप्पर योग ! रातोरात बदलणार नशीब; कुणाला शुभ तर कुणाला अशुभ घ्या जाणून

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

SCROLL FOR NEXT