Apple Launch 2025 new devices esakal
विज्ञान-तंत्र

Apple Launch 2025 : अ‍ॅपल लॉन्च करणार तब्बल १५ नवे डिव्हाइस; नेमकं काय असेल स्पेशल? पाहा एका क्लिकवर

Apple Launch 2025 new devices : अ‍ॅपल २०२५ मध्ये तब्बल १५ नवे डिव्हाइस लॉन्च करणार असून यामध्ये iPhone 17, AirPods Pro 3 आणि HomePad यांचा समावेश आहे.

Saisimran Ghashi

Apple device Launch 2025 Update : अ‍ॅपलप्रेमींसाठी २०२५ वर्ष ठरणार आहे खास!कारण तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी Apple तब्बल १५ नवे डिव्हाइसेस लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या यादीत iPhone 17 सिरीज, AirPods Pro 3, Apple Watch Series 11, Ultra 3, नवीन MacBook Air, iPad Air, आणि नवीन HomePad स्मार्ट डिव्हाइस यांचा समावेश आहे. कंपनीच्या नेहमीच्या परंपरेनुसार या उत्पादनांची घोषणा WWDC 2025 मध्ये जूनमध्ये सुरू होणार असून मुख्य लॉन्च इव्हेंट सप्टेंबरमध्ये अपेक्षित आहे.

iPhone 17 सिरीज

iPhone प्रेमींसाठी मोठी बातमी म्हणजे 2025 मध्ये येणाऱ्या iPhone 17 सिरीजमध्ये यावेळी Plus मॉडेलला गुडबाय करण्यात येणार आहे. त्याऐवजी अधिक स्लिम आणि हलका iPhone 17 Air हे नवीन मॉडेल मार्केटमध्ये येणार आहे. याशिवाय नेहमीप्रमाणे iPhone 17, iPhone 17 Pro आणि Pro Max ही मॉडेल्स देखील असणार आहेत.

AirPods Pro 3

Apple चे AirPods Pro 3 हे नवीन जनरेशन इअरबड्सदेखील २०२५ मध्ये येणार आहेत. यामध्ये Apple Intelligence (AI) चा वापर करण्यात आला असून, H3 चिपसेट, रिअल-टाइम भाषांतर, आणि प्रगत ऑडिओ टेक्नॉलॉजीचा समावेश असेल.

Apple Watch Series 11 आणि Ultra 3

Apple Watch मध्ये आता अधिक प्रगत हेल्थ मॉनिटरिंग फीचर्स येणार आहेत. आगामी Series 11 आणि Ultra 3 मध्ये हायपरटेन्शन डिटेक्शन, सॅटेलाईट कनेक्टिव्हिटी आणि 5G RedCap सारख्या फिचर्सचा समावेश असणार आहे. हे घड्याळ हेल्थ कॉनशस लोकांसाठी बेस्ट ठरणार आहे.

HomePad अ‍ॅपलचं नवीन स्मार्ट होम डिव्हाइस

Apple आपल्या स्मार्ट होम सिस्टीममध्येही एक नवा डिव्हाइस घेऊन येत आहे HomePad. ६ ते ७ इंचांच्या डिस्प्लेसह येणारा हा डिव्हाइस अ‍ॅपलच्या संपूर्ण इकोसिस्टीमसह सिंक्रोनाइझ होऊ शकतो. iPhone, iPad आणि HomePod Mini सोबत याची जोड तयार होणार आहे. याचबरोबर HomePod Mini साठी सॉफ्टवेअर अपडेट देखील अपेक्षित आहे.

WWDC 2025

जूनमध्ये होणाऱ्या WWDC 2025 (Worldwide Developers Conference) मध्ये अ‍ॅपल आपले नवे उत्पादन आणि त्यामागील AI आधारित सॉफ्टवेअर अपग्रेड्सचे अनावरण करणार आहे. डेव्हलपर-केंद्रित या इव्हेंटमध्ये हार्डवेअरसोबत सॉफ्टवेअरची नवी माहिती देखील स्पष्ट होइल.

२०२५ हे वर्ष अ‍ॅपलच्या चाहत्यांसाठी अपग्रेडचे वर्ष ठरणार आहे. स्मार्टफोन, इअरबड्स, स्मार्टवॉचपासून स्मार्ट होम डिव्हाइसेसपर्यंत अ‍ॅपल नवनवीन तंत्रज्ञान घेऊन पुन्हा एकदा बाजारात वर्चस्व गाजवण्यासाठी तयार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Election Results: ठाकरे ब्रँडला एकटे प्रसाद लाड कसे ठरले वरचढ? मुंबईतल्या 'बेस्ट'च्या निवडणुकीचा निकाल

APL 2025: ६,६,६,४,४,४... पी अर्जुन तेंडुलकरचा १२ चेंडूत धुमाकूळ! स्फोटक फलंदाजीनं वेधलं लक्ष

Nashik Crime : अघोरी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचा विनयभंग; नाशिकमध्ये भोंदूबाबावर पोक्सोचा गुन्हा

'पहाटेची वेळ आणि बसमध्ये पुरुषांचे घाणेरडे स्पर्श' भारती सिंहने सांगितला भयंकर अनुभव म्हणाली...'त्याने मला घट्ट पकडलं आणि...'

Rain-Maharashtra Latest Live News Update: अनिलकुमार पवार, वाय एस रेड्डी, सिताराम गुप्ता आणि अरूण गुप्ता यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

SCROLL FOR NEXT