iPhone 12 Radiation eSakal
विज्ञान-तंत्र

iPhone 12 Radiation : आयफोन रेडिएशन प्रकरणाबद्दल काही बोलू नका; अ‍ॅपल कंपनीची कर्मचाऱ्यांना ताकीद - रिपोर्ट

Apple iPhone SAR : फ्रान्समध्ये आयफोन-12 च्या विक्रीला बंदी लागू करण्यात आली आहे.

Sudesh

अ‍ॅपल कंपनीच्या आयफोन-12 या फोनमधून मोठ्या प्रमाणात रेडिएशन उत्सर्जन होत असल्याचा आरोप फ्रान्स सरकारने केला आहे. यामुळे फ्रान्समध्ये आयफोन-12 च्या विक्रीलाही बंदी लागू करण्यात आली आहे. यानंतर आता अ‍ॅपल कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना याबाबत कोणतंही वक्तव्य करण्यास मज्जाव केला आहे.

ब्लूमबर्गने एका रिपोर्टमध्ये याबाबत माहिती दिली आहे. कंपनीने आपल्या टेक-सपोर्ट स्टाफलाही याबाबत काही बोलण्यास मनाई केली आहे. आयफोनच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न विचारल्यास अ‍ॅपलचे सर्व कर्मचारी हेच सांगत आहेत, की अ‍ॅपलची उत्पादने सुरक्षित आहेत. या आयफोनसह इतर उत्पादने भरपूर चाचणी केल्यानंतरच यूजर्सपर्यंत पोहोचवली जातात, असं कर्मचारी सांगत आहेत.

काय आहे प्रकरण?

फ्रान्स सरकारने अ‍ॅपल कंपनीवर असा आरोप केला आहे, की iPhone 12 मधून होणारं रेडिएशन उत्सर्जन हे EU मधील SAR मानकांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे यूजर्सच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळेच फ्रान्सने आयफोन-12 च्या विक्रीला बंदी लागू केली आहे.

फ्रान्सने केलेल्या आरोपांनंतर युरोपियन युनियनमधील इतर देशांनीही आपल्याकडील iPhone 12 आणि इतर अ‍ॅपल उत्पादनांची चाचणी सुरू केली आहे.

अ‍ॅपलने फेटाळले आरोप

अ‍ॅपल कंपनीने मात्र हे आरोप पूर्णपणे फेटाळले आहेत. EU मधील SAR मानांकन हे ग्लोबल स्टँडर्डपेक्षा कमी आहे. मात्र या फोनच्या लाँचिंगवेळी रेडिएशन बाबतच्या सर्व चाचण्या अ‍ॅपलने पार पाडल्या होत्या असंही कंपनीने म्हटलं आहे.

आयफोन-12चं उत्पादन बंद

दरम्यान, कंपनीने नुकताच आपला नवीन आयफोन-15 लाँच केला आहे. यानंतर कंपनीने आयफोन-12 चं उत्पादन बंद केल्याची घोषणा केली होती. फ्रान्सने केलेले आरोप आणि अ‍ॅपलचा निर्णय यांमध्ये काही दिवसांचा फरक असल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : शक्तीपीठ विरोधात १३ जिल्ह्यांत जमीन मोजणीला वेग?, लातूर, हिंगोलीतून विरोधक एकवटणार; कोल्हापुरातील बैठकीत नेमकं काय घडलं

Mumbai: पनवेल-कर्जत लोकल लवकरच सुरु होणार, दररोज ५० गाड्या धावणार; प्रवाशांना दिलासा मिळणार!

Congress High Drama : "कसले अध्यक्ष?"; विचारताच काँग्रेस कार्यालयात तुफान राडा, नेत्यांवर थेट चप्पल-बुटांचा मारा!

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT