iPhone Camera Module eSakal
विज्ञान-तंत्र

iPhone Camera Module : चीनचा बाजार उठणार? टायटन अन् मुरुगप्पा ग्रुप भारतात बनवू शकतात आयफोनचे कॅमेरे; रिपोर्टमध्ये दावा

Apple iPhone : सध्या आयफोनचे कॅमेरे हे चीनमध्ये तयार होतात. तिथून ते आयात करावे लागतात. मात्र, भारतात याचं उत्पादन सुरू झाल्यास चीनवर अवलंबून रहावं लागणार नाही.

Sudesh

Apple Camera Module : मेक इन इंडिया मोहिमेअंतर्गत जगभरातील कित्येक कंपन्या भारतात येत आहेत. अगदी टेक जगतातील दिग्गज कंपनी अ‍ॅपलने देखील आयफोनचं उत्पादन भारतात सुरू केलं आहे. यातच आता आयफोनच्या कॅमेऱ्याचं उत्पादन देखील भारतात शक्य होणार असल्याचं दिसत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अ‍ॅपल कंपनी सध्या कॅमेरा मॅन्युफॅक्चरिंगसाठी टाटा ग्रुपच्या टायटन कंपनीशी आणि मुरुगप्पा ग्रुपशी चर्चा करत आहे. सध्या आयफोनचे कॅमेरे हे चीनमध्ये तयार होतात. तिथून ते आयात करावे लागतात. मात्र, भारतात याचं उत्पादन सुरू झाल्यास चीनवर अवलंबून रहावं लागणार नाही.

भारतातील आयफोन उत्पादन दुप्पट

भारतात सध्या मोठ्या प्रमाणात आयफोनचं उत्पादन घेतलं जातं. 2023-24 या वर्षात भारतातून होणारी आयफोन निर्यात दुप्पट झाली आहे. भारतातून सगळ्यात जास्त निर्यात अमेरिकेत केली जात आहे. मात्र सध्या भारतात आयफोनच्या कॅमेरा मॉड्यूलचा सप्लायर उपलब्ध नाही. मुरुगप्पा किंवा टायटनसोबत पुढील पाच ते सहा महिन्यांमध्ये अ‍ॅपलची डील होण्याची शक्यता आहे.

दोन्ही कंपन्यांकडे प्रदीर्घ अनुभव

इकॉनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टनुसार, या दोन्ही कंपन्यांकडे प्रिसीजन पार्ट्स बनवण्याचा अनुभव आहे. टायटन कंपनी आपल्या घड्याळांसाठी आणि दागिन्यांसाठी असे लहान पार्ट्स बनवते. तर मुरुगप्पा ग्रुप देखील 100 वर्षांपेक्षा अधिक काळापासून इंडस्ट्रीमध्ये आहे. 2022 साली मुरुगप्पा ग्रुपने कॅमेरा मॉड्यूल बनवणाऱ्या मोशाइन इलेक्ट्रॉनिक्स कंपनीमध्ये शेअर्स विकत घेतले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

Mohol drought crisis: मोहोळ तालुका दुष्काळाच्या गडद छायेत; खरीप-रब्बी हंगाम उद्ध्वस्त, चारा टंचाईने शेतकरी आर्थिक कोंडीत

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT