Apple iPhone 14 Series Launch Event : Apple ने अखेर नवीन iPhones आणि त्यांचे इतर डिव्हाइसेस लाँच करण्यासाठी आमंत्रण पाठवले आहेत. Apple च्या या 'फार आउट' ( Far Out) इव्हेंटमध्ये कंपनी नवीन iPhone 14 सीरीज लाँच करू शकते. याशिवाय कंपनी नवीन Apple वॉच सीरीज आणि नवीन आयपॅड मॉडेल्स देखील लॉन्च करेल अशी अपेक्षा आहे.
Apple ने 7 सप्टेंबर रोजी होणाऱ्या त्यांच्या फ्लॅगशिप आयफोन 14 सीरीज लॉन्च इव्हेंटची तारीख घोषित करून त्यासाठी आमंत्रणे पाठवली आहेत, या इव्हेंटमध्ये कंपनी iPads आणि Apple Watches सारखे इतर गॅझेट देखील लॉंच करेल अशी अपेक्षा आहे.
चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचलेली असताना Apple ने अद्याप लॉन्च डेट व्यतिरिक्त काहीही सांगितले नाही. मात्र काही लीक्सच्या माध्यमातून आगामी iPhones बद्दल जवळजवळ सर्व काही आधीच उघड झाले आहे. या रिपोर्टनुसार या वर्षी देखील आयफोन 14 सीरीजमध्ये आयफोन 14, iPhone 14 Max, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max या चार नवीन iPhone मॉडेल्सचा समावेश असेल. असे सांगितले जात आहे की कंपनी यावर्षी 'मॅक्स' मॉडेलसाठी आयफोन 14 मिनी लॉन्च करणार नाही.
Apple iPhone 14 चे स्पेसिफीकेशन्स
आयफोन 14 सीरीज नवीन डिझाइन, प्रो मॉडेलपेक्षा अधिक चांगला कॅमेऱ्यासह अनेक अपडेटसह येईल. त्याच वेळी, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max बद्दल असेही बोलले जात आहे की ते एका चांगल्या कॅमेरा मॉड्यूलसह येऊ शकतात. आयफोन 14 सीरीजमघील दोन्ही प्रो मॉडेल्स ट्रिपल रीअर कॅमेरा सेटअपसह येतील, ज्यामध्ये 48MP प्रायमरी कॅमेरा, 12MP अल्ट्रा-वाइड आणि टेलिफोटो लेन्स असतील. iPhone 14 सीरीज 8K व्हिडिओला सपोर्ट करेल. Apple iPhone 14 Pro मॉडेल 8GB रॅम आणि 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्लेसह येईल. आयफोन 14 सीरीजच्या डिव्हाइसची बेस स्टोरेज क्षमता 64GB असेल, असे तज्ञांचे मत आहे.
AirPods Pro 2 देखील होऊ शकतात लॉन्च
प्रथमच, एअरपॉड्स प्रो लॉसलेस प्लेबॅक सपोर्टसह येऊ शकतात. एअरपॉड्स अधिक कॉम्पॅक्ट डिझाइनसह येण्याची शक्यता आहे. AirPods Pro 2 स्किन-डिटेक्ट सेन्सरसह येण्याची अपेक्षा आहे.
Apple यावर्षी तीन स्मार्टवॉच मॉडेल लाँच करेल अशी अपेक्षा आहे. यामध्ये Apple Watch Series 8, Apple Watch Series SE मॉडेल आणि एक स्ट्रॉंग मॉडेलचा समावेश असण्याची शक्यता आहे. आता कंपनी कोणती प्रॉडक्ट्स लॉन्च करणार आहे हे इव्हेंटमध्येच कळेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.