Apple iPhone 15
Apple iPhone 15  google
विज्ञान-तंत्र

Apple iPhone 15 : आयफोन १५चे फीचर्स लीक; एवढी असू शकते किंमत

नमिता धुरी

मुंबई : iPhone 14 सीरीजनंतर बहुप्रतीक्षित असणाऱ्या Apple iPhone 15 चे फीचर्स आणि किंमत अशी माहिती समोर आली आहे. अपकमिंग आयफोन 15 सीरीजमधील iPhone 15 Ultra चे फीचर्स इंटरनेटवर लीक झाले आहेत. इंटरनल सोर्स LeaksApplePro च्या एका लेटेस्ट ट्वीटनुसार, iPhone 15 Ultra निर्मितीत iPhone 14 Pro Max च्या तुलनेत जास्त खर्च करण्यात येणार आहे.

Apple iPhone 14 Pro Max चे टॉप-एंड मॉडेलची (1TB स्टोरेज) भारतीय बाजारात 1 लाख 89 हजार 900 रुपये किंमत आहे. आयफोन 15 अल्ट्राची किंमत आयफोन 14 प्रो मॅक्सच्या तुलनेत खूप जास्त असू शकते, असा अंदाज ट्वीटवरून लावला जात आहे. Apple iPhone 15 ची किंमत 2 लाख रुपयांच्या वर असू शकते. हेही वाचा - गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

काय आहेत iPhone 15 Ultra संभाव्य फीचर्स

Apple iPhone 15 Ultra मध्ये प्रीमियम टाइटेनियम बॉडी मिळण्याची शक्यता आहे. टाइटेनियममुळे केवळ अपकमिंग Apple iphone 15 Ultra ला प्रीमियम फील देईल, सोबतच स्मार्टफोन स्टीलच्या तुलनेत वजनाने हलका असेल.

मजबूत आणि स्क्रॅच रेसिस्टेंट देखील असेल. टाइटेनियम केस असलेला आयफोनमध्ये वापरलेले जाणारे मटेरियल 35 टक्के जास्त महागडा आहे. स्मार्टफोन ड्युअल फ्रंट कॅमेऱ्यासोबत येण्याची शक्यता आहे. असा आयफोन पहिल्यांदा बाजारात येणार आहे.

Apple ने यूरोपीय संघाच्या निर्णयानंतर आयफोन्ससाठी आता USB टाईप-सी चार्जिंग पोर्ट वापरण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे iPhone 15 सीरीज मधील फोन्समध्ये USB-C पोर्ट असण्याची शक्यता आहे. Apple iPhone 15 Pro आणि iPhone 15 Ultra मध्ये देखील मागील जनरेशन मॉडेलच्या तुलनेत अधिक रॅमची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, इतर अपग्रेडमध्ये Apple iPhone 15 सीरीजमध्ये इन-हाऊस 5G मोडेमची सुविधा मिळू शकते. मात्र, क्वालकॉमने याबाबत अद्याप जास्त खुलासा केलेला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup 2024: केएल राहुलला डच्चू, तर हार्दिक उपकर्णधार; वर्ल्ड कपसाठी कसं भारतीय संघात कसं आहे खेळाडूंचं संमिश्रण

Latest Marathi News Live Update : मनीष सिसोदियांना झटका! कोर्टानं दुसऱ्यांदा नाकारला नियमित जामीन

Dombivli News : डोंबिवलीत महाविकास आघाडीचे शक्तिप्रदर्शन; उमेदवार वैशाली दरेकर यांनी भरला उमेदवारी अर्ज

Kiran Mane: उज्ज्वल निकम अन् एस.एम. मुश्रीफांच्या पुस्तकातले सिक्रेट्स; मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत किरण मानेंनी शेअर केली पोस्ट

Rajan Patil : मोहोळ तालुक्याचा दुष्काळ हटविण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराला ज्यादा मताधिक्य देण्याचा निर्धार - राजन पाटील

SCROLL FOR NEXT