iPhone 15 Action button eSakal
विज्ञान-तंत्र

iPhone 15 Action Button : नव्या आयफोनमध्ये मिळणार 'अ‍ॅक्शन बटण'; कसं करेल काम? जाणून घ्या

Apple iPhone 15 : अ‍ॅपलच्या आयफोन-15 प्रो आणि आयफोन-15 प्रो मॅक्स या फोनमध्ये दोन मोठे बदल दिसून आले.

Sudesh

अ‍ॅपलने आपली बहुप्रतिक्षित आयफोन-15 सीरीज काल (12 सप्टेंबर) लाँच केली. आपल्या वार्षिक इव्हेंटमध्ये या सीरीजीची घोषणा करण्यात आली. अपेक्षेप्रमाणे नवीन आयफोनमध्ये कित्येक अपडेट्स आणि नवीन फीचर्स देण्यात आले आहेत.

अ‍ॅपलच्या आयफोन-15 प्रो आणि आयफोन-15 प्रो मॅक्स या फोनमध्ये दोन मोठे बदल दिसून आले. मागच्या मॉडेलमध्ये असणारे म्युट बटण यामध्ये काढून टाकण्यात आलं आहे. त्याजागी नव्या आयफोन-15 प्रो मॉडेल्समध्ये एक अ‍ॅक्शन बटण देण्यात आलं आहे.

कसं आहे अ‍ॅक्शन बटण?

यापूर्वीच्या आयफोन मध्ये असणाऱ्या रिंगर/म्युट बटणाची जागा हे नवीन बटण घेईल. हे बटण बाय-डीफॉल्ट सायलंट किंवा रिंगर टॉगलप्रमाणे काम करेल. मात्र, याची सेटिंग बदलून यूजर्स इतर गोष्टींसाठी देखील याचा वापर करू शकणार आहे.

या बटणाचा वापर तुम्ही व्हॉईस रेकॉर्डिंग सुरू करण्यासाठी, कॅमेरा सुरू करण्यासाठी, अ‍ॅक्सेसिबिलिटी फंक्शन्स सुरू करण्यासाठी तसंच कित्येक फीचर्स किंवा अ‍ॅप्स लाँच करण्यासाठी शॉर्टकट म्हणूनही या बटणाचा वापर करता येऊ शकतो.

यूएसबी-सी

नव्या आयफोन सीरीजच्या डिझाईनमधील आणखी एक मोठा बदल म्हणजे, टाईप-सी चार्जिंग पोर्ट. यामुळे आता आयफोन-15 सीरीजमधील कोणताही फोन अँड्रॉईडच्या टाईप-सी चार्जिंग केबलने चार्ज करता येणार आहे. ज्यांच्याकडे आधीपासून लाईटनिंग चार्जिंग केबल आहे, त्यांना मात्र नवीन टाईप-सी केबल विकत घ्यावी लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT