iPhone old Parts eSakal
विज्ञान-तंत्र

Apple iPhone Repair : अ‍ॅपलच्या ग्राहकांना कंपनीने दिलं मोठं गिफ्ट! आता स्वस्तात दुरूस्त होणार आयफोन

iPhone old Parts : आयफोन यूजर्सना माहिती असेल, की यापूर्वी आयफोनमधील एखादा पार्ट खराब झाल्यास त्याठिकाणी केवळ नवीन ओरिजिनल पार्टच बसवता येत होता.

Sudesh

Apple Repair : अ‍ॅपल कंपनीने आपल्या आयफोन यूजर्सना एक मोठं गिफ्ट दिलं आहे. यामुळे खराब झालेले आयफोन दुरुस्त करण्यासाठी आता कमी खर्च करावा लागणार आहे. कारण आता आयफोनमध्ये अ‍ॅपलचे जुने ओरिजिनल पार्ट्स देखील बसवता येणार आहेत.

आयफोन यूजर्सना माहिती असेल, की यापूर्वी आयफोनमधील एखादा पार्ट खराब झाल्यास त्याठिकाणी केवळ नवीन ओरिजिनल पार्टच बसवता येत होता. दुसऱ्या कंपनीचा किंवा अ‍ॅपलचाच जुना पार्ट बसवल्यानंतर फेस आयडी, टच आयडी असे बरेचसे फीचर्स बंद होत होते. मात्र आता असं होणार नाही. आयफोनमध्ये अ‍ॅपलचे ओरिजनल पण जुने पार्ट्स देखील बसवता येणार आहेत.

कंपनीने बदलला मोठा नियम

आतापर्यंत अ‍ॅपल कंपनीचा रिपेअरिंगबाबत एक मोठा नियम होता. आयफोनचा सीरियल क्रमांक आणि बदलण्यात आलेल्या नवीन पार्टचा सीरियल क्रमांक मॅच होणं गरजेचं होतं. यामुळे आधी वापरण्यात आलेले जुने पार्ट्स वापरणं अशक्य होतं. आता हा नियम बदलण्यात आला असून, रिपेअर केल्यानंतर बसवलेल्या पार्ट्सचा सीरियल नंबर कॅलिब्रेट करण्यात येईल. त्यामुळे फोन नीट काम करेल.

सध्या ही सुविधा केवळ iPhone 15 सीरीजला लागू करण्यात आली आहे. येत्या काळात इतर मॉडेल्सना देखील ही सुविधा लागू होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे यूजर्सचा भरपूर फायदा होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

SCROLL FOR NEXT