Apple's New Clean Up Tool: A Magic Eraser Rival esakal
विज्ञान-तंत्र

Magic Eraser Tool : आता चुटकीसरशी गायब होणार फोटोतील नकोसा भाग;वापरून पाहा 'हे' नवीन AI टूल

WWDC 2024 : Google, Samsung आणि आता Apple मध्येही आलंय हे AI टूल

Saisimran Ghashi

Tech Tips : आजकाल आपल्या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यात एवढी ताकद आहे, की DSLR ची गरजच पडत नाही. पण कधी कधी एखाद्या सुंदर फोटोमध्ये अचानक एखादी व्यक्ती येऊन उभी राहते किंवा एखादी गोष्ट मधे येऊन अडथळी निर्माण करते. अशावेळी तो फोटो डिलीट करण्याशिवाय पर्याय उरत नाही. पण आता बदलत्या स्मार्ट काळासोबत.स्मार्टफोन कंपन्यांमध्ये आता एक नवीन युद्ध सुरू झाले आहे ते म्हणजे AI-powered फोटो एडिटिंगची!

गेल्या काही महिन्यांत Google, Samsung, OnePlus आणि आता Apple या सर्व कंपन्यांनी फोटोमधून अनावश्यक वस्तू वा भाग हटवण्यासाठी AI टूल लाँच केले आहे. WWDC 2024 मध्ये, Apple ने Google, Samsung आणि OnePlus मधील वैशिष्ट्ये मिररिंग, फोटो ॲपसाठी AI-शक्तीवर चालणारे क्लीन अप टूल लॉन्च केले.

हे टूल कसं काम करतं?

अगदी सोपं आहे. फोटो निवडा, नको असलेली व्यक्ती किंवा वस्तू पॉईंट करा आणि ओके करा. त्यानंतर बाकी काम AI सांभाळतो. AI त्या वस्तूला जादूसारखं गायब करून त्या जागी त्याचं परिपूर्ण बॅकग्राऊंड तयार करतो.

आधी Google च्या Pixel फोनमध्ये उपलब्ध असलेलं हे Magic Eraser टूल आता अनेक Android फोनवर मोफत उपलब्ध आहे. Samsung च्या Galaxy S24 मध्ये Generative Edit नावाचं टूल आहे, तर OnePlus ने देखील OnePlus 12 आणि Nord CE 4 मध्ये AI Eraser लाँच केलं आहे. आता Apple नेही Photos app मध्ये Clean Up टूल आणलं आहे.

या AI टूल्सचा दुसरा फायदा म्हणजे ते AIच्या दिशेने होणारा प्रवास आहे. अगदी सोपं एडिटिंग टूल जरी असलं तरी ते कंपनीच्या AI क्षेत्रातील प्रगतीचं दर्शन घडवतं. त्यामुळे ग्राहकांना विश्वास वाटतो, की कंपनी नवीन तंत्रज्ञान वापरण्यासाठी आघाडीवर आहे.

या टूल्सचा उद्देश फक्त फोटो एडिटिंग इतकाच नाही. त्यांचा उद्देश ग्राहकांना त्यांच्या ecosystem मध्ये अधिक गुंतवून ठेवणे आणि त्यांचेकडे अधिक उत्पादने खरेदी करवणे हा देखील आहे. उदाहरणार्थ, Googleचं Magic Eraser Google One subscription सोबत आलं होतं. पण आता ते मोफत उपलब्ध आहे. यामुळे Google अधिक User Central कंपनी म्हणून पुढे येते.

फोटो एडिटिंगची ही AI टेक्नॉलॉजी अजून विकसित होत आहे पण भविष्यात स्मार्टफोन फोटोग्राफी तंत्रज्ञानाच्या कोणत्या टप्प्यावर जाणार आहे याचा हा स्पष्ट संकेत आहे. आता Apple देखील या स्पर्धेत आलं आहे. म्हणजेच भविष्यात आणखी चांगली आणि वापरण्यास सोपी एडिटिंग टूल्स आपल्याला स्मार्टफोनवरच पाहायला मिळतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

Katraj Issues : सोपानकाकानगरमध्ये नागरी सुविधांचा अभाव, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी; तीन वर्षांपासून करत भरुनही महापालिकेचे दुर्लक्ष

Agriculture News : ऊस पिकावर हुमणीच्या प्रादुर्भावाचा धोका; कृषी विभागातर्फे प्रभावी उपाययोजना करण्याचे आवाहन

Women Empowerment: घरच नव्हे, गावही चालविणार! छप्पन्न गावांत लवकरच महिलाराज, १११ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर

IND vs ENG 2nd Test: हॅरी ब्रूकने 'खांद्या'ने वाचवली स्वतःची विकेट! लढवली अक्कल, पण झाला असता त्याचाच गेम; रिषभ पंत भडकला

SCROLL FOR NEXT