Apple's Next Launch Event iPhone 16, AirPods, and Watch Expected on September 10 esakal
विज्ञान-तंत्र

iPhone 16 Launch : ठरलं तर मग! सप्टेंबरच्या 'या' तारखेला लाँच होणार iPhone 16 सीरिज; मेगा इवेंटमध्ये दिसणार वॉच आणि एयरपॉडची झलक

iPhone 16 Series, Apple Watch and AirPods to Expected to launch in september : ॲपलच्या सप्टेंबरच्या इवेंटमध्ये अजून काय काय लाँच करणार आहे याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

Saisimran Ghashi

iPhone 16 Launch Event : आयफोन प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. ॲपल 10 सप्टेंबरला त्यांची बहुचर्चित iPhone 16 सीरिज लाँच करण्याची तयारी करत आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, या कार्यक्रमात नवीन Apple Watch आणि AirPodsचीही झलक पाहायला मिळणार आहे.

iPhone 16 मध्ये काय खास?

  • ॲपल यावेळी चार नवीन मॉडेल्स लाँच करण्याची शक्यता आहे - iPhone 16, iPhone 16 Plus, iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max.

  • iPhone 16 Pro आणि Pro Max मध्ये मोठे डिस्प्ले आणि सुधारित अल्ट्रा-वाइड एंगल कॅमेरा असण्याची शक्यता आहे.

  • या प्रो मॉडेल्समध्ये मोठ्या बॅटरीजही असू शकतात.

  • या सर्व मॉडेल्समध्ये ॲपलची नवीन 'कॅप्चर' बटण असण्याची अटकळ आहे, ज्यामुळे जलद छायाचित्रे काढणे सोपे होईल.

  • यावेळी सर्व मॉडेल्स ॲपलच्या नवीन AI टेक्नॉलॉजी आणि सिरीच्या सुधारित आवृत्तीला सपोर्ट करतील.

AirPods आणि Apple Watch मध्ये काय नवीन?

ॲपल दोन नवीन AirPods मॉडेल्स लाँच करण्याची शक्यता आहे. बजेटमधील आणि एक मिड-रेंज पर्याय असेल. मिड-रेंज AirPods मध्ये ऍक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन (Active Noise Cancellation) ची सुविधा असू शकते. नवीन Apple Watch Series 10 मध्ये मोठे स्क्रीन आणि आधीपेक्षा स्लिम बॉडी असण्याची शक्यता आहे.

या लिक्सवरून अंदाज लावता येतो की, ॲपलचा हा मेगा इवेंट अनेक नवीन आणि रोमांचक प्रोडक्टसच्या घोषणांनी भरलेला असेल. ॲपल 10 सप्टेंबरमध्ये अजून काय काय लाँच करणार आहे याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. कारण या वर्षाच्या सुरुवातीपासूनच आयफोन प्रेमी या नव्या सीरिजच्या एंट्रीची वाट बघत होते.लवकरच कंपनीकडूनही या मेगा लॉंचबद्दल अधिकृत घोषणा करण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Traffic: बाप्पाच्या आगमनात खड्ड्यांचे विघ्न! मार्गावर तब्बल ८०० खड्ड्यांच साम्राज्य

Pune Election: नव्या प्रभाग रचनेमुळे १६ प्रभागांमध्ये गडबड; ६४ नगरसेवकांवर थेट परिणाम; 'या' पक्षांना बसणार फटका

Pune News : पतीला अर्ध यकृत दिल, प्रत्यारोपणनंतर पत्नीसह दोघांचाही मृत्यू; पुण्यातील रुग्णालयात घटनेने खळबळ

दोन महिन्यात उजनीतून सोडले 97 TMC पाणी! उजनी धरणाचे 16 दरवाजे 3 फुटाने उघडले; भीमा नदीतील विसर्ग 45 हजार क्युसेक, पंढरीतील पूरस्थिती आज पूर्वपदावर

Mumbai News: पावसाची पुन्हा विश्रांती पण मुंबईकरांना दिलासा, सातही धरणात ९५ टक्के पाणीसाठा; पाहा आकडेवारी

SCROLL FOR NEXT