Apple Event 2023 new Watch eSakal
विज्ञान-तंत्र

Apple Event 2023 : कशा आहेत अ‍ॅपलच्या दोन नव्या वॉच? जाणून घ्या फीचर्स अन् किंमत

Apple Watch 9 Series : या वॉचमध्ये कित्येक नवीन फीचर्स देण्यात आलेले आहेत.

Sudesh

अ‍ॅपलचा बहुप्रतिक्षित वाँडरलस्ट इव्हेंट आज (12 सप्टेंबर) पार पडला. या इव्हेंटमध्ये कंपनीने आयफोन 15 सीरीज आणि दोन नव्या अ‍ॅपल वॉच लाँच केल्या. या वॉचमध्ये कित्येक नवीन फीचर्स देण्यात आलेले आहेत.

अ‍ॅपल वॉच सीरीज 9

अ‍ॅपलच्या कार्यक्रमाची सुरुवात टिम कुक यांच्या स्टेटमेंटने झाली. त्यानंतर नवीन अ‍ॅपल वॉच लाँच करण्यात आली. अ‍ॅपल वॉच सीरीज 9 यामध्ये अगदी नवीन S9 SiP चिप देण्यात असल्याची घोषणा कंपनीने केली. याचं डिझाईन मात्र मागच्या मॉडेलप्रमाणेच आहे.

या नवीन अ‍ॅपल वॉचमध्ये 2000 निट्स ब्राईटनेस देण्यात आली आहे. सोबतच यामध्ये ऑन-डिव्हाईस सिरी, नवीन जेस्चर, नवीन ओएस आणि नवीन फीचर्स देण्यात आले आहेत. या वॉचमध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. सोबतच आयफोन शोधण्याचं फीचरही यात दिलं आहे.

अ‍ॅपल वॉच अल्ट्रा 2

अ‍ॅपलने आपली अल्ट्रा 2 ही वॉचदेखील या कार्यक्रमात लाँच केली. यामध्ये तब्बल 3000 निट्स डिस्प्ले देण्यात आलेला आहे. यामध्ये देखील S9 चिप सपोर्ट दिला आहे. याची स्क्रीन अधिक मोठी आणि अधिक फंक्शनल आहे. या वॉचमध्ये नवीन मॉड्यूलर अल्ट्रा नावाचा वॉचफेस देण्यात आला आहे. ही अ‍ॅपलची आतापर्यंतची सर्वात रग्गड वॉच असणार आहे.

नवीन जेस्चर

या दोन्ही वॉचमध्ये अ‍ॅपलने एक भन्नाट फीचर दिलं आहे. या वॉच एका हाताने वापरता याव्यात यासाठी यामध्ये नवीन जेस्चर देण्यात आलं आहे. यामुळे तुम्ही ज्या हातामध्ये ही अ‍ॅपल वॉच घातली आहे, त्याचं पहिलं बोट केवळ तुमच्या अंगठ्यावर डबल टॅप करून तुम्ही वॉचला कमांड देऊ शकाल. फोन उचलणे, गाणं बदलणे अशा कित्येक गोष्टींसाठी हे जेस्चर वापरता येईल. यामुळे अ‍ॅपल वॉचचा वापर करणं अधिक सुलभ होणार आहे.

किती आहे किंमत?

अ‍ॅपल वॉच सीरीज 9 दोन व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. याच्या GPS व्हेरियंटची किंमत 399 डॉलर्स आहे. तर, GPS+Cellular व्हेरियंटची किंमत 499 डॉलर्स आहे. तर अ‍ॅपल वॉच अल्ट्रा 2 ची किंमत 799 डॉलर्स एवढी असणार आहे. याचं केवळ GPS+Cellular व्हेरियंट उपलब्ध आहे.

लेदरचा वापर नाही

विशेष म्हणजे या दोन्ही वॉचेसच्या लाँचिंगवेळी अ‍ॅपलने एक मोठी घोषणा केली. पर्यावरणाच्या रक्षणासाठी म्हणून कंपनीने मोठं पाऊल उचललं आहे. कार्बन इमिशन कमी करण्यासाठी अ‍ॅपल आता आपल्या उत्पादनांमध्ये लेदर वापरणार नाही. अ‍ॅपल वॉच 'सीरीज 9' आणि 'अल्ट्रा 2'च्या कुठल्याही पट्ट्यामध्ये लेदरचा वापर होणार नाही. यासाठी अ‍ॅपलने एक नवीन प्रॉडक्ट लाँच केलं आहे. लेदरऐवजी अ‍ॅपल आता त्या प्रॉडक्टचा वापर करेल, असं कंपनीने जाहीर केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT