apple watch 6 ecg feature saves life of 34 year old mans life resident from Haryana  
विज्ञान-तंत्र

Apple Watch ने वाचवला वापरकर्त्याचा जीव; 'हे' खास फीचर ठरलं जीवनदायी

सकाळ डिजिटल टीम

Apple ही जगप्रसिध्द कंपनी त्यांच्या iPhone साठी जगभर प्रसिध्द आहे. या कंपनीची उत्पादने महाग असली तरी वापरकर्त्यांना त्यामध्ये पैसे वसूल फीचर्स मिळतात. Apple च्या सर्व उत्पादनांमध्ये सर्वात खास ठरलं आहे ते Apple Watch. यामध्ये तुम्हाला ECG सारखे अनेक खास फीचर्स उपलब्ध आहेत आणि त्यामुळे एखाद्याचा जीव वाचवल्याबद्दल याची वारंवार चर्चा होत असते. यावेळी देखील Apple Watch 6 याच कारणामुळे चर्चेत आहे. यावेळी Apple वॉचने हरियाणातील एका 34 वर्षीय भारतीय वापरकर्त्याचा जीव वाचवला आहे.

प्रकरण असे घडले की, हरियाणातील रहिवासी असलेल्या नितेश चोप्रा यांना गेल्या वर्षी त्यांच्या पत्नीने अॅपल वॉच सीरीज 6 भेट दिली होती. त्यादरम्यान त्यांनी नितेशला फक्त घड्याळ भेट दिले होते पण आज या घड्याळामुळे नितेशचा जीव वाचला आहे. नितेशने अलीकडेच छातीत दुखत असल्याच्या तक्रारीनंतर त्याची पत्नी नेहाने त्याला Apple Watch Series 6 वर ECG तपासण्यास सांगितले.

Apple वॉचच्या ईसीजी रिपोर्टमध्ये काहीतरी गडबड आढळून आल्यावर दोघेही हॉस्पिटलमध्ये गेले, तिथे नितेशची अँजिओग्राफी करावी लागली. चोप्रा यांना डॉक्टरांनी सांगितले की, त्यांच्या 99.9 टक्के रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्या आहेत. शस्त्रक्रियेनंतर काही दिवसांनी नितेशला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

नेहा यांनी सांगितले की, डॉक्टरांनी तिच्या हृदयावर स्टेंट लावला आणि सांगितले की, आम्ही भाग्यवान आहोत की काहीही वाईट घडले नाही. नेहाने पुढे म्हणाल्या की, Apple वॉचने स्वतः नोटिफीकेशन दिले होते, की त्याच्या रक्तवाहिन्यांमध्ये समस्या आहे. नेहा आणि नितेश यांनी Appe चे सीईओ टिम कुक यांचे पत्र लिहून आभार देखील मानले आहेत. दोघांच्या पत्रावर टीम कुक यांनी उत्तर देत कृतज्ञता व्यक्त केली आहे. महत्वाचे म्हणजे नितेश चोप्रा हे देखील स्वतः एक डेंटिस्ट आहेत.

Apple वॉचमध्ये इलेक्ट्रोकार्डियोग्राम (ECG) चे फीचर देण्यात आले आहे. याला वैद्यकीय प्रमाणपत्र देखील मिळाले आहे. याआधीही Apple वॉचच्या ईसीजी आणि फॉल डिटेक्शन फीचरने अनेकांचे प्राण वाचवले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thar Accident सोमवारी पुण्याहून कोकणात जायला निघाले, गुरुवारी ताम्हिणी घाटातल्या दरीत थारसह ६ मृतदेह दिसले; कधी आणि काय घडलं?

भारतीय जवानाचं शिरच्छेद करून मुशर्रफसमोर ठेवलं, काय आहे किस्सा? ‘धुरंदर’मध्ये अर्जुन रामपाल साकारणार त्या राक्षसाचा चेहरा

Chief Minister Security : कोणत्या मुख्यमंत्र्यांना आहे जबरदस्त सुरक्षा कवच अन् जाणून घ्या, नितीश कुमारांची सुरक्षा कशी?

Tamhini Ghat Accident : ताम्हिणी घाटात मोटार खोल दरीत कोसळली, चार मृतदेह हाती; मृतांची नावे समोर, सर्वजण पुण्यातील

Latest Marathi News Update LIVE : अमरावतीत काँग्रेसची आढावा बैठक; तीनही नगरपरिषद जिंकण्याचा कार्यकर्त्यांचा निश्चय

SCROLL FOR NEXT