Apple Watch Series 10 launched sleep apnea health feature esakal
विज्ञान-तंत्र

Apple Watch 10 सीरिजची मार्केटमध्ये एंट्री; स्लीप अ‍ॅपनियाच्या आजाराशी लढण्यासाठी सज्ज, क्षणात देणार हेल्थ अपडेट्स

Apple Watch Series 10 Features : ‘ॲपल’ने बहुप्रतिक्षीत ॲपल वॉच सीरिज-10 बाजारात आणली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Apple Watch Series 10 : ‘ॲपल’ने बहुप्रतिक्षीत ॲपल वॉच सीरिज-10 बाजारात आणली आहे. ॲपल वॉचमधील आतापर्यंतचा मोठा डिस्प्ले असलेल्या या घड्याळात अनेक नव्या सुविधा देण्यात आल्या आहेत. हे घड्याळ तुमच्या आरोग्यावर लक्ष ठेवणार असून तुमच्या शरीरात बदल झाल्यास तो तुम्हाला समजू शकतो. तुमच्या झोपेवरही ॲपल वॉचचे लक्ष असेल. वॉटर स्पोर्ट खेळणाऱ्यांना या घड्याळाचा चांगला फायदा होणार असून लाटांचा आणि पाण्याच्या खोलीचा अंदाज मिळण्याची सुविधा यामध्ये आहे. याशिवाय अल्ट्रा-2 या नव्या घड्याळाचीही घोषणा यावेळी करण्यात आली.

ॲपल वॉच सीरिज-10

- आतापर्यंतची सर्वांत कमी जाडीचे घड्याळ

- सर्वांत मोठा डिस्प्ले, वाइड अँगल डिस्प्ले

- स्टेनलेस स्टीलऐवजी ग्रेड-५ टिटॅनियमचा वापर

- वेगान चार्जिंग

- बॅटरी १८ तास

- किंमत : ४९९ डॉलर

अल्ट्रा-2

- ग्रेड-५ ब्लॅक टिटॅनियमचा वापर

- सर्वाधिक अचूक जीपीएस

- बॅटरी ३६ तास

- ऑफलाइन मॅप

- किंमत : ७९९ डॉलर

जागतिक स्तरावर 1 अब्जहून अधिक लोकांना त्रास देणाऱ्या झोपेच्या गंभीर आजाराशी लढण्यासाठी आता Apple Watch Series 10 तुमच्या सोबत असणार आहे. हे स्मार्टवॉच तुमच्या झोपे दरम्यान श्वास घेण्याच्या अडथळ्यांची माहिती देऊन झोपेच्या apnia (स्लीप एपनिया) या आजाराविषयी तुम्हाला सजग करेल,असे कंपनीने सांगितले.

एअर पॉड-4

- आतापर्यंतचे सर्वांत आरामदायी

- बॅटरी ३० तास

- यूएसबी- ‘सी’ आणि वायरलेस चार्जिंगची सोय

- ॲपल सिलिकॉन

- फोर्स सेन्सरचा वापर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT