ration card
ration card e sakal
विज्ञान-तंत्र

घरबसल्या मिळतं रेशन कार्ड; जाणून घ्या ऑनलाइन प्रक्रिया

सूरज यादव

सरकारच्यावतीने देण्यात येणारं धान्यासाठी रेशन कार्ड आवश्यक असतं. याशिवाय सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठीही याची गरज असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने गरीबांना मोफत धान्य देण्याची घोषणा केली होती. यामध्ये अनेक राज्यांकडून मोफत धान्य दिलं जात आहे. दिल्ली आणि उत्तर प्रदेशात रेशन कार्ड नसेल तरीही सरकारकडून धान्य देण्यात येतंय. तर इतर ठिकाणी रेशन कार्ड यासाठी आवश्यक आहे. तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तर तुम्हाला ते घरबसल्या तयार करून घेता येतं. यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया आहे. सर्व राज्यांकडून रेशन कार्डसाठी संकेतस्थळ तयार करण्यात आलं आहे. रेशन कार्ड तयार करून घेण्यासाठी तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता. त्यासाठी राज्याच्या अधिकृत संकेतस्थळावर जा. सध्या उत्तर प्रदेशात अशी सुविधा आहे. तिथं https://nfsa.up.gov.in/Food/citizen/Default.aspx वरून फॉर्म डाउनलोड करता येतो. महाराष्ट्रासाठी mahafood.gov.in या संकेतस्थळावर रेशनकार्डसाठी फॉर्म डाउनलोड करण्याची सुविधा आहे. सध्या ऑनलाइन अर्ज मात्र करता येत नाही.

उत्तर प्रदेश सरकारच्या संकेतस्थळावर Apply online for ration card असा पर्याय आहे.

  • रेशन कार्ड तयार करण्यासाठी ओळख पत्र म्हणून आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, आरोग्य कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी देता येते.

  • अर्जासाठी शुल्क हे 5 रुपयांपासून ते 45 रुपयांपर्यंत आहे. अर्ज भऱल्यानंतर शुल्क देऊन तो अर्ज सबमिट करा.

  • अर्ज केल्यानंतर फिल्ड व्हेरिफिकेशन केले जाते. त्यानंतर तुमचा अर्ज योग्य आढळला तरच रेशन कार्ड तयार होते.

रेशन कार्डसाठी कोण अर्ज करू शकतं

भारताचे नागरिकत्व असलेली व्यक्ती रेशन कार्डसाठी अर्ज करू शकते. 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांचे नाव त्यांच्या पालकांच्या रेशन कार्डमध्ये समाविष्ट केले जाते. मात्र त्यापेक्षा जास्त वय असलेल्यांसाठी वेगळं रेशन कार्ड मिळू शकतं.

रेशन कार्डसाठी ओळख म्हणून लागणाऱ्या कागदपत्रांशिवाय आणखी काही कागदपत्रे लागतात. त्यामध्ये पॅनकार्ड, पासपोर्ट साइज फोटो, उत्पन्नाचा दाखला, पत्त्याचा पुरावा म्हणून वीजबील, गॅस कनेक्शन बूक, टेलिफोन बिल, बँक स्टेटमेंट, पासबूक, भाडे करार या कागदपत्रांची आवश्यकता असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

SCROLL FOR NEXT