Bike Launch in April 2025 India esakal
विज्ञान-तंत्र

Bikes in April : बाईक प्रेमींसाठी एप्रिलमध्ये धमाका ऑफर! 'या' 5 दमदार बाईक होणार लाँच, किंमत अन् मायलेज पाहा एका क्लिकवर

Bike Launch in April 2025 India : एप्रिल २०२५ मध्ये KTM, Hero, Bajaj आणि Kawasaki कडून दमदार नव्या बाईक्स लाँच होणार आहेत. याची सविस्तर माहिती जाणून घ्या.

Saisimran Ghashi

Bike Launch in April 2025 : एप्रिल महिना बाईक आणि स्कूटर्सच्या लाँचिंगसाठी धमाकेदार ठरणार आहे. भारतात ऑफ-रोडिंग, सुपरमोटो आणि इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर KTM, Hero, Bajaj आणि Kawasaki यांच्याकडून अनेक नवीन मॉडेल्स बाजारात येण्याची शक्यता आहे. चला तर पाहूया यंदा एप्रिलमध्ये कोणत्या नव्या दुचाकी गाड्या रस्त्यांवर धावणार आहेत.

KTM 390 Adventure R

KTM चं 390 Adventure R हे बाईक त्यांच्या आताच्या मॉडेलपेक्षा अधिक ताकदवान आणि ऑफरोडिंग क्षमतेचे आहे. त्यात अधिक मजबूत सस्पेन्शन, मोठं रिअर व्हील आणि उंच सीट हाइट देण्यात आली आहे. 390cc इंजिनसह ही बाईक 4 लाखांच्या आसपास असण्याची शक्यता आहे.

KTM 390 SMC R

KTM चं आणखी एक सुसज्ज मॉडेल म्हणजे 390 SMC R. ही सुपरमोटो शैलीतील बाईक आहे, जी सध्या भारतात फारशी उपलब्ध नाही. ही बाईक भारतात 3.4 लाखांच्या आसपास लॉन्च होण्याची शक्यता आहे आणि KTM ला यामध्ये फर्स्ट मूव्हर अ‍ॅडव्हांटेज मिळू शकतो.

Hero Karizma XMR 250

हिरोची Karizma XMR 210 ची विक्री थांबल्यानंतर आता कंपनी नवीन Karizma XMR 250 घेऊन येण्याच्या तयारीत आहे. नव्या डिझाइनसह अधिक पॉवरफुल इंजिन आणि अपडेटेड फिचर्ससह ही बाईक 250cc सेगमेंटमध्ये मोठा दावा ठरू शकते.

Bajaj Chetak 3503

Bajaj आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Chetak 3503 लवकरच सादर करणार आहे. 3.5kWh बॅटरी पॅकसह ही स्कूटर कंपनीच्या सर्वात परवडणाऱ्या स्कूटर्सपैकी एक असणार आहे. डिझाईन Chetak प्रमाणेच असेल, पण फिचर्समध्ये थोडा फरक पाहायला मिळू शकतो.

Kawasaki Z900

Kawasaki त्यांची प्रचंड लोकप्रिय असलेली Z900 बाईक 2025 मध्ये अपडेटेड फिचर्ससह पुन्हा मार्केटमध्ये आणण्याच्या तयारीत आहे. TFT डिस्प्ले, 6-axis IMU आणि इतर अत्याधुनिक फिचर्ससह ही बाईक उत्साही रायडर्ससाठी जबरदस्त पर्याय असणार आहे.

KTM चं ऑफ-रोडिंग, Hero ची दमदार Karizma, Bajaj ची स्मार्ट इलेक्ट्रिक स्कूटर आणि Kawasaki चं टेक्नोलॉजीयुक्त बीस्ट हे एप्रिलमध्ये रस्त्यावर भन्नाट बाईक्स धावणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! बिहारमध्ये NDA मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला? कोणत्या पक्षातून किती मंत्री होणार? 'या' दिवशी शपथविधी सोहळ्याची शक्यता

Asia Cup, IND A vs PAK A: वैभव सूर्यवंशी, नमन धीर पाकिस्तानविरुद्ध बरसले! भारताने विजयासाठी ठेवलं 'इतक्या' धावांचं लक्ष्य

Viral Video: 91व्या वर्षीही करतात 12 तास ड्यूटी! फिट राहण्याचं सिक्रेट विचारताच आजोबांनी दिलं असं काही उत्तर...नेटकरीही झाले थक्क

Solapur Political : मंगळवेढ्यात काँग्रेसचा पंढरपूरप्रमाणे आघाडीसोबत लढण्याचा पॅटर्न!

मेडिक्लेम पॉलिसी घेताना अर्ज व्यवस्थित भरून देणे गरजेचे; अपुऱ्या अर्जामुळे...

SCROLL FOR NEXT