Artificial Inteligence esakal
विज्ञान-तंत्र

Artificial Inteligence : तुमच्या वैयक्तीक आयुष्यात आग लावू शकतो AI, इंटरनेटवर डीपफेक पॉर्नचा पूर...

जिकडे तिकडे आर्टिफीशियल इंटेलिजंसचं पेव फुटलं आहे.

धनश्री भावसार-बगाडे

AI Porn DeepFake Effect On Personal life : आजकाल जगभरात आर्टिफीशियल इंटेलिजेंसचं पेव फुटलं आहे. या तंत्रज्ञानाने कधी विचार न केलेल्या गोष्टीही शक्य होताना दिसत आहेत. पण प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू आहेत. जसे सकारात्मक परिणाम आहे तसे नकारात्मकही आहेत.

एआय संदर्भात अशा काही शक्यता समोर येत आहेत की, ज्यामुळे तुमच्या वैयक्तीक आयुष्यावर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकेल.

डीपफेक व्हिडीओज काय असतात?

डीपफेक व्हिडीओज असे असतात की, जे डिजीटली तयार केले जातात. यात एआयच्या मदतीने बदल केले जातात. अशा प्रकारचे व्हिडीओज काही वर्षांपासून बनवून प्रसारीत केले जात आहेत. काही वर्षांपूर्वी रेडिट यूजरने अशी क्लीप शेयर केली होती की, ज्यात खांद्याच्यावर चेहरा सेलिब्रिटीचा होता. एआयच्या मदतीने हा चेहरा बदलण्यात आला होता. हा बदल तर खरा वाटावा असा असतो. त्यामुळे या तंत्रज्ञानाचा उपयोग सगळ्यांनाच विशेषतः महिलांसाठी मोठी समस्या ठरू शकते.

डीपफेक क्रिएटर सध्या लोकांना टारगेट करण्यासाठी आणि इंटरनेट यूझर्सला अॅट्रॅक्ट करण्यासाठी अशा प्रकारचे व्हिडीओ बनवतात. यात पत्रकार, नेते, अॅक्ट्रेस यांच्या चेहऱ्यांचा वापर केला जातो. इंटरनेटवर असे हजारो व्हिडीओज उपलब्ध आहेत. काही तर असे व्हिडीओज आहेत जे लोकांना त्यांचे स्वतःचे चेहरे लावण्याचा ऑप्शन देतात.

तज्ज्ञ सांगतात की, डीपफेक बनवणं सध्या फारच सोप झालं आहे. तंत्रज्ञान पुढे जात राहणार आणि त्या सोबतच वेगवेगळ्या प्रकारच्या अशा गोष्टी वाढतच राहणार. ऑनलाइन सेक्शुअल व्हॉइलंस, डीपफेक पॉर्न, डीपफेक पॉर्न इमेजेसच्या माध्यमातून लोकांना त्रास देणे सुरु झाले आहे.

एका घटनेचा उल्लेख करत ऑस्ट्रेलियाचे एक्स्पर्ट नोएला मार्टिन यांनी सांगितलं की, एका २८ वर्षांच्या मुलीने गुगलवर आपला फोटो सर्च करण्याचा प्रयत्न केला तर तिला तो डीपफेक पॉर्नमध्ये मिळाला. तिलाही माहित नव्हतं की व्हिडीओ कसा बनला. त्यानंतर अनेक वेबसाइटशी संपर्क करून व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच ठिकाणी संपर्क होऊ शकला नाही. मग काही दिवसाने ती कोर्टात गेली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT