Moon Rovers eSakal
विज्ञान-तंत्र

Moon Rovers : 'चांद्रयान-3'च्या यशामुळे दिग्गज कार कंपन्यांच्या आशा वाढल्या; चंद्रावर पाठवणार अ‍ॅडव्हान्स रोव्हर्स

Lunar Rovers : ह्युंडाई, टोयोटा आणि जनरल मोटर्स अशा दिग्गज कंपन्या चंद्रावर रोव्हर पाठवण्यासाठी उत्सुक आहेत.

Sudesh

चांद्रयान-3 मोहीम यशस्वी झाल्यानंतर भारतावर आणि इस्रोवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आतापर्यंत कित्येक मोठ्या देशांना शक्य झाली नाही, अशी कामगिरी भारताने करून दाखवली आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग करून, रोव्हर चालवणारा पहिला देश भारत ठरला आहे.

इस्रोने ही मोहीम यशस्वी करून दाखवल्यानंतर आता जगभरातील कित्येक स्पेस एजन्सी आणि कार कंपन्यांच्या आशा वाढल्या आहेत. ह्युंडाई, टोयोटा आणि जनरल मोटर्स अशा दिग्गज कंपन्या चंद्रावर रोव्हर पाठवण्यासाठी उत्सुक आहेत. यासाठी या कंपन्यांनी रोव्हरचे डिझाईन देखील तयार केले आहेत.

नासाची योजना काय?

जगातील सर्वात मोठी स्पेस एजन्सी नासादेखील चांद्रयानाच्या यशाने भारावून गेली आहे. 1971 साली अपोलो-15 मोहिमेच्या माध्यमातून अमेरिकेने पहिल्यांदाच चंद्रावर रोव्हर पाठवलं होतं. सध्या चंद्रावर अमेरिकेचे एकूण तीन मून-रोव्हर आहेत. मात्र यातील एकही रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ किंवा लपलेल्या भागात नाहीये.

लवकरच नासा चंद्रावरील आपल्या रोव्हर्सची संख्या वाढवणार आहे. जनरल मोटर्स कंपनीसोबत मिळून नासा नेक्स्ट जनरेशन मून व्हेईकल्स तयार करत आहे. ही वाहनं नासाच्या आगामी आर्टेमिस मोहिमेचा भाग होऊ शकतात.

जनरल मोटर्स अनुभवी कंपनी

जनरल मोटर्स कंपनीकडे मून-रोव्हर्स बनवण्याचा अनुभव आहे. चंद्रावर पाठवण्यात आलेलं पहिलं मून-रोव्हर बोईंग हेदेखील जनरल मोटर्ससोबत मिळून तयार करण्यात आलं होतं. आता ही कंपनी चक्क अंतराळवीरांना नेऊ शकेल असं लूनार मोबिलिटी व्हेईकल बनवत आहे. चंद्राच्या अंधार असलेल्या भागात चालवण्यासाठी हे एक शक्तिशाली आणि स्वयंचलित रोव्हर असणार आहे.

ह्युंडाईचं टायगर एक्स-1

दुसरीकडे दक्षिण कोरियातील ह्युंडाई कंपनीने देखील एक अल्टिमेट मोबिलिटी व्हेईकल तयार केलं आहे. हे वाहन पृथ्वीसोबतच अन्य कोणत्याही ग्रहावर चालवता येईल, असा दावा कंपनीने केला आहे. सध्या याचं कन्सेप्ट डिझाईन तयार केलं असून, TIGER X-1 असं नाव या व्हेईकलला दिलं आहे.

हे रोव्हर अंतराळवीरांना घेऊन जाऊ शकणार नाही. मात्र, चंद्र किंवा कोणत्याही प्रकारच्या खडकाळ जमीनीवर हे आरामात चालू शकतं. यामध्ये मॉड्यूलर आर्किटेक्चर, धातूची चाकं, 360 डिग्री ट्रॅक्शन कंट्रोल असे बरेच फीचर्स दिले आहेत.

जपानही शर्यतीत

जपानी कार कंपनी टोयोटा देखील या मून-रोव्हर रेसमध्ये मागे नाही. जपानची अंतराळ संशोधन संस्था JAXA सोबत मिळून टोयोटा कंपनीने देखील एका रोव्हरची निर्मिती सुरू केली आहे. 'लूनार क्रूजर' असं या रोव्हरचं नाव आहे. हे रोव्हर हायड्रोजन फ्युअलवर चालेल.

टोयोटा हे अशा प्रकारचं रोव्हर तयार करण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यामधून अंतराळवीरांना स्पेस-सूट न वापरताही प्रवास करता येईल. हे दोन व्यक्तींसाठी असणार आहे, मात्र आपत्कालीन परिस्थिती चार लोक बसू शकतील. चंद्राच्या ध्रुवांजवळ अंतराळवीरांना पाठवण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. हे रोव्हर 10 टन वजनाचं असण्याची शक्यता आहे.

स्पेस एक्स

मंगळावर वस्ती करण्याचं स्वप्न असणाऱ्या इलॉन मस्कची कंपनी या शर्यतीत कशी मागे राहील? 2026 पूर्वी आपण प्रायव्हेट मून रोव्हर लाँच करणार आहे, अशी घोषणा मस्कने यापूर्वीच केली आहे. आगामी स्टारशिप मोहिमेत कंपनी आपलं FLEX हे मून-रोव्हर चंद्रावर पाठवू शकतं. स्टारशिप ही कॅलिफोर्नियातील अ‍ॅस्ट्रोलॅब कंपनीची चांद्रमोहीम आहे. दुसरीकडे, नासाच्या आर्टेमिस मोहिमेत देखील फ्लेक्स वापरलं जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT