Unknown Calls Esakal
विज्ञान-तंत्र

Unknown Calls : अनोळखी नंबरवरून आलेले फोन उचलू नका! केंद्र सरकारचा नागरिकांना सल्ला, 'हे' आहे कारण

स्कॅमर्स नवनवीन पद्धतींनी लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत आहेत.

Sudesh

देशाचे टेलिकॉम मिनिस्टर अश्विनी वैष्णव यांनी नागरिकांना अनोळखी फोन न उचलण्याचे आवाहन केले आहे. देशात ऑनलाईन स्कॅम आणि फसवणुकीच्या घटना वाढत असल्यामुळे त्यांनी हा सल्ला दिला आहे. यावेळी त्यांनी सरकारने केलेल्या कारवाईबाबत देखील माहिती दिली.

काय दिला सल्ला?

देशातील वाढत चाललेल्या फसवणुकीच्या घटनांबाबत विचारलं असता, अश्विनी वैष्णव यांनी लोकांना खबरदारी घेण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, की सरकार याबाबत कारवाई करत आहेच मात्र लोकांनीही खबरदारी घेणं गरजेचं आहे. "मी प्रत्येक भारतीय नागरिकाला असं आवाहन करतो, की त्यांनी केवळ अशा नंबरचे फोन उचलावेत, ज्यांना ते ओळखतात. अनोळखी नंबरवरून आलेल्या कॉल्सना उचलणे टाळावे." असं वैष्णव म्हणाले.

सरकारची कारवाई

दरम्यान, केंद्र सरकारने आतापर्यंत अशा फसवणुकीच्या घटना रोखण्यासाठी बरीच पावलं उचलली आहेत. यातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे 'संचार साथी' पोर्टलची सुरूवात. वैष्णव म्हणाले, की सरकारने गेल्या काही दिवसांमध्ये 40 लाखांहून अधिक फेक नावांनी घेतली गेलेली सिमकार्ड ब्लॉक केली आहेत. यासोबतच अशी सिम कार्ड विकणाऱ्या 41 हजार अनधिकृत एजंट्सना ब्लॉकलिस्ट केलं आहे.

स्कॅमच्या घटनांमध्ये वाढ

दरम्यान, स्कॅमर्स नवनवीन पद्धतींनी लोकांची फसवणूक करण्याचा आणि डेटा चोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. कधी व्हॉट्सअ‍ॅपवर व्हिडिओ कॉल करून, तर कधी फेसबुकवर मेसेज करून लोकांची फसवणूक केली जात आहे. यासोबतच, आणखी एक नवीन प्रकार आता समोर आला आहे. चक्क 'दिल्ली पोलीस' बोलतोय म्हणून एका महिलेचा डेटा चोरी करण्यात आला होता.

त्यामुळे अशा प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी अनोळखी कॉल्स न घेण्याचं आवाहन करण्यात येतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : कोकण, घाटमाथा, विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’; उर्वरित कोकण, विदर्भात जोरदार पाऊस शक्य

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

MS Dhoni Birthday: धोनी का आहे दिग्गज खेळाडू, याची साक्ष देणारे हे रेकॉर्ड्स माहित आहेत का?

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

SCROLL FOR NEXT