Ather 450 Apex eSakal
विज्ञान-तंत्र

Ather 450 Apex : एथरने लाँच केली खास '450 अ‍ॅपेक्स' इलेक्ट्रिक स्कूटर; अगदी स्टायलिश आहे डिझाईन!

एथरला १० वर्षे झाल्याने हे विशेष मॉडेल लाँच केले आहे. या मॉडेलची सर्वात मोठी खासियत म्हणजे, ही देशातील पहिली ट्रान्सपॅरन्ट डिझाईन असणारी स्कूटर आहे.

सकाळ वृत्तसेवा

Ather 450 Apex : देशातील आघाडीची इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादक एथर एनर्जीने ४५० ॲपेक्स मॉडेल बाजारपेठेत सादर केले आहे. एथरला १० वर्षे झाल्याने हे विशेष मॉडेल लाँच केले आहे. या मॉडेलची सर्वात मोठी खासियत म्हणजे, ही देशातील पहिली ट्रान्सपॅरन्ट डिझाईन असणारी स्कूटर आहे. नवे मॉडेल चालविण्यास सुलभ आहे. त्यात ग्राहकांना आवडेल, अशी आकर्षक रंगसंगती आहे.

याविषयी एथर एनर्जीचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तरुण मेहता म्हणाले, ‘‘एथरला १० वर्षे पूर्ण होत असताना आम्हाला काहीतरी विशेष करायचे होते. त्यामुळे आकर्षक डिझाईन आणि सर्वांनाच चालविण्यास उपयुक्त असे ४५० अ‍ॅपेक्स मॉडेल बाजारपेठेत आणले आहे. एथरने आतापर्यंत उत्पादित केलेली ही सर्वोत्तम स्कूटर आहे. आम्ही ४५० ॲपेक्समध्ये ‘मॅजिक ट्विस्ट’ सादर केला आहे. हे एक नावीन्यपूर्ण वैशिष्ट्य आहे, जे शहरात ई-स्कूटर चालवणे अत्यंत सोईस्कर बनवते. ४५० ॲपेक्स एक प्रीमियम आणि आकर्षक स्कूटर आहे.’’

ही इलेक्ट्रिक स्कूटर फक्त २.९ सेकंदात प्रती तास ४० किलोमीटरपर्यंत वेग वाढवू शकते. हा थ्रॉटल रिस्पॉन्स टाइम केवळ इलेक्ट्रिक स्कूटरमध्येच नाही, तर पेट्रोल स्कूटरमध्येही सर्वांत वेगवान आहे. या मॉडेलच्या बॅटरीची क्षमता जास्त असून, ब्रेक सिस्टिमही अत्याधुनिक आहे. निळा व नारंगी रंगाने हे मॉडेल आकर्षक झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT