विज्ञान-तंत्र

ऑडी इंडियाचा मोठा निर्णय, १ एप्रिलपासून कार महागणार

सकाळ डिजिटल टीम

1 एप्रिलपासून कारच्या किंमतीत 3 टक्के वाढ होणार

इनपुट कॉस्टमध्ये वाढ झाल्याने घेतला निर्णय

जर्मनीची लक्झरी कार बनवणारी कंपनी ऑडी (Audi)ने मोठा निर्णय घेतला आहे. ऑडी इंडियाने आपल्या कारचे दर वाढविण्याचा निर्णय घेतला असून १ एप्रिल २०२२ पासून एसयूव्ही कारच्या किंमतीत ३ टक्के वाढ करणार आहे. ''इनपुट कॉस्टमध्ये वाढ झाल्याने कारच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली आहे. (Audi India's cars will be more expensive from April 1)

ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंह ढिल्लों यांनी दिलेल्या माहितीनुसार, "वाढत्या खर्चामुळे आणि परकीय चलन दरातील बदलांमुळे आम्हाला आमच्या मॉडेल श्रेणीमध्ये तीन टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची गरज आहे."

ऑडी इंडियाच्या सध्याच्या लाईन-अपमध्ये पेट्रोलवर चालणाऱ्या ऑडी ए४, ऑडी ए६, ऑडी ए८ एल, ऑडी क्यू२, ऑडी क्यू५, आणि नुकत्याच लॉन्च झालेल्या ऑडी क्यू७, ऑडी क्यू८, ऑडी एस५ स्पोर्टबॅक, ऑडी आरएस ५ स्पोर्टबॅक, ऑडी आरएस ७ स्पोर्टबॅक तसेच ऑडी आरएस क्यू८ चा समावेश आहे.

ई-ट्रॉन ब्रॅण्ड अंतर्गत कंपनीच्या इलेक्ट्रिक वाहन पोर्टफोलियोमध्ये ऑडी ई-ट्रॉन ६०, ऑडी ई-ट्रॉन ५५, ऑडी ई-ट्रॉन स्पोर्टबॅक ५५, ऑडी ई-ट्रॉन जीटी आणि आरएस ऑडी ई-ट्रॉन जीटीचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : पिंपरी चिंचवड हादरले ! निगडीतील मंदिरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; मेट्रो कामगाराला पोलिसांनी घेतले ताब्यात

एका क्षणात सगळं बदललं ! मधू कांबीकरांच्या आयुष्यातील सर्वात कठीण प्रसंग, स्टेजवर नाचल्या, अन्...!

सारा तेंडुलकरच्या बर्थडे पार्टीत तिला घट्ट मिठी मारणारा तो तरुण कोण? वहिनी सानिका पाहतच राहिली; Video Viral

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींचा ज्ञानेश कुमार यांना इशारा; म्हणाले, ‘तुमची झोप उडाली आहे, आम्ही तुम्हाला सोडणार नाही’

Kolhapur Ambabai Temple : नवरात्रोत्सवात नाही, तर कधी वाजणार? अंबाबाई मंदिर परिसरातील ‘म्युझिकल खांब’ बंदच; लाखो रुपये खर्च

SCROLL FOR NEXT