विज्ञान-तंत्र

देशात ऑडीच्या इलेक्ट्रिक कारसाठी बुकिंग सुरु

कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर या गाड्या बुक केल्या जाऊ शकतात.

प्रणीत पवार

मुंबई : ऑडी इंडियाने इलेक्ट्रिक एसयूव्हीसाठी ऑडी ई-ट्रोन आणि ऑडी ई-ट्रोन स्पोर्टबॅकसाठी बुकिंग सुरु केले आहे. या दोन्ही कार ड्युअल मोटर सेटअपद्वारे बनवलेल्या आहेत. तसंच त्या ३०० केडब्ल्यू / ४०८ एचपी आणि ६६४ एनएमचा टॉर्क तयार करत असून ९५ किलोवॅट क्षमतेच्या बॅटरीमुळे मोठ्या प्रमाणावर पॉवर मिळते. या दोन्ही गाड्या ५.७ सेकंदात ०-१०० किमी प्रतितासचा वेगाचा गाठतात. या कार एका चार्जिंगमध्ये ३५९ ते ४८४ किलोमीटर्सचा पल्ला पार करू शकतात. (audi-starts-bookings-in-india-for-all-electric-suv)

प्रोग्रेसिव्ह स्टीयरिंग, अ‍ॅडॉप्टिव्ह एअर सस्पेंशन, ४ झोन एअर कंडिशनर, मॅट्रिक्स एलईडी हेडलॅम्प्स, ११ केडब्ल्यू एसी होम चार्जर (८.५ तासात कारला पूर्ण चार्जे करण्यासाठी), या स्टॅंडर्ड सुविधा या गाड्यांमध्ये आहेत. ऑडी इंडिया डीलरशिपमध्ये व कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर या गाड्या बुक केल्या जाऊ शकतात.

"इलेक्ट्रिक वाहने ही सध्याचं भविष्य आहेत. म्हणूनच आम्हाला एसयूव्ही ऑडी ई-ट्रोन व ऑडी ई-ट्रोन स्पोर्टबॅक या दोन इलेक्ट्रिक गाड्यांसाठी बुकिंग सुरु करताना आनंद मिळतोय. ई-ट्रोन केवळ एक उत्पादन नाही. तर ब्रँड आहे. आम्ही या ब्रँडखाली अनेक नवीन मॉडेल बाजारात आणणार आहोत", असं ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंह ढिल्लो म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Rain Alert : घाट माथ्यासह कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचं कमबॅक! पुढील चार दिवस 'या' मुदतीत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज, 'यलो अलर्ट' जारी

Mumbai Metro: मुंबईत मेट्रो कामाचा आणखी एक बळी! धावत्या दुचाकीवर लोखंडी बॅरिकेड कोसळला, एकाचा मृत्यू

सोन्याच्या हव्यासापोटी सात मित्र पोहोचले शापित हवेलीत; ‘भूतम् भयम्’चा थरार कुठे आणि कधी पहायला मिळणार?

Budh Guru Yog Horoscope 2026 : बुध-गुरुची ही 'शुभ युती' बदलणार भाग्य! 'या' 4 राशींसाठी ठरू शकतो लाभदायी; आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता

Marathi News Live Updates : कुलाब्यातील गणेशोत्सव मंडळाच्या तक्रारीवरून संजय राऊत आक्रमक; थेट मुंबई पोलीस आयुक्तांना लिहिलं पत्र

SCROLL FOR NEXT