Australia to Ban Social Media for minors esakal
विज्ञान-तंत्र

Social Media Ban : हे काय नवीन! 16 वर्षांच्या आतील मुलांचे सोशल मीडिया अकाऊंट होणार बंद, या सरकारचा मोठा निर्णय

Social Media Ban in Australia : जगभर सोशल मिडियाचे वारे वाहत असताना या सरकारने १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियाच्या वापरावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

Saisimran Ghashi

New Law to Block Under 16 age users from Social Media in Australia : जगभर सोशल मिडियाचे वारे वाहत असताना ऑस्ट्रेलियाने १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियाच्या वापरावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी एका पत्रकार परिषदेत या निर्णयाची घोषणा केली. हा कायदा पुढील काही महिन्यांत संसदेत मांडण्यात येणार असून, त्यानंतर कायदा मंजूर झाल्यानंतर १२ महिन्यांनी त्याची अंमलबजावणी होईल. हा कायदा अमलात आल्यानंतर १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करता येणार नाही. या कायद्यामुळे मुलांवर होणारे मानसिक आणि सामाजिक दुष्परिणाम कमी करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

सोशल मीडिया कंपन्यांची जबाबदारी वाढणार या कायद्याच्या अंमलबजावणीनंतर सोशल मीडिया कंपन्यांना मुलांचे वय तपासून, त्यांना प्रवेश नाकारण्याची जबाबदारी घेतली जाईल. ऑस्ट्रेलियाच्या माहिती व तंत्रज्ञान मंत्री मिशेल रोलँड यांनी सांगितले की, यामध्ये मेटाचे इंस्टाग्राम व फेसबुक, बाइटडान्सचे टिकटॉक, आणि इलॉन मस्कचे एक्स (पूर्वीचे ट्विटर) हे प्लॅटफॉर्म समाविष्ट करण्यात येतील. तसंच यूट्यूबलाही या यादीत समाविष्ट करण्याची शक्यता आहे. या कंपन्यांकडून अद्याप यावर प्रतिक्रिया आलेली नाही.

अन्य देशांत कायदे मुलांना सोशल मीडियामुळे होणाऱ्या नकारात्मक परिणामांपासून वाचवण्यासाठी जगभरातील अनेक देशांनी वेगवेगळे नियम आखले आहेत. फ्रान्समध्येही १५ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्याची प्रस्तावना करण्यात आली होती. अमेरिकेत देखील १३ वर्षांखालील मुलांचे डेटा संकलन करण्यासाठी पालकांची परवानगी आवश्यक आहे.

सोशल मीडियाचा मुलांवर होणारा परिणाम सोशल मीडियाचा अत्यधिक वापर मुलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम करतो. त्यात विशेषतः मुलांच्या मानसिक आरोग्यावर होणारा प्रभाव लक्षात घेण्याजोगा आहे.

मानसिक आरोग्यावर प्रभाव: सोशल मीडियावर दाखवलेल्या आदर्श जीवनशैलीच्या प्रतिमांमुळे मुलांना असुरक्षित वाटू शकते. यामुळे त्यांना नैराश्याचा सामना करावा लागू शकतो.

सायबरबुलिंगचा धोका: सोशल मीडियावर मुलांना बऱ्याचदा सायबरबुलिंगचा धोका असतो. त्यातून त्यांना स्वतःबद्दल कमीपणाची भावना येऊ शकते.

शारीरिक आरोग्यावर परिणाम: सोशल मीडियावर जास्त वेळ घालवून मुलं शारीरिक खेळ व इतर क्रियाकलापांना वेळ देत नाहीत, ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.ऑस्ट्रेलियाचा हा निर्णय हा बालकांच्या सुरक्षिततेसाठीचा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

१३ वर्षांपासून शारीरिक संबंध नाही, विकी डोनर बनवून ठेवलंय... टीव्हीच्या श्रीकृष्णाने पत्नीवर केलेले गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT